भक्तांना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्सला अस्तव्यस्त गाड्या लावल्यामुळे अडथळा निर्माण झाला ! बिवीजीच्या सेक्युरिटी गार्डच्या मनमानी कारभारामुळे ;रुग्णाचा जीव टांगणीला !
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

भक्तांना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्सला अस्तव्यस्त गाड्या लावल्यामुळे अडथळा निर्माण झाला !
बिवीजीच्या सेक्युरिटी गार्डच्या मनमानी कारभारामुळे ;रुग्णाचा जीव टांगणीला !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तिर्थक्षेत्र येथे सध्या शारदीय नवरात्र महोत्सव चालू असून सध्या लाखो भाविक आईच्या दर्शनासाठी तुळजापूर शहरामध्ये दररोज दाखल होत आहेत
भवानी रोड लोखंडी गेट जवळ मंदिर संस्थांनी बीव्हीजी कंपनीचे सिक्युरिटी गार्ड व त्यांची चौकी प्रस्थापित असून देखील गेटच्या पुढे मोठ्या प्रमाणात फोर व्हीलर लावल्यामुळे तुळजाभवानी मंदिराकडून सिरीयस भक्तांना घेऊन जाणारी दि 6/10/2024 रोजी ॲम्बुलन्स ला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या सिरीयस भक्ताला अडथळा निर्माण झाला तो केवळ तेथे नेमणूक केलेल्या बीव्हीजी कंपनीच्या सेक्युरिटी यांनी कामात कसूर व हलगर्जीपणा केल्यामुळे मुळे मग हे सिक्युरिटी काय फक्त पगार उचलून झोपा काढतात का ?
यांच्या या हलगर्जीपणामुळे एखादा पेशंट दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही झालेल्या प्रकाराची श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान चे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने दखल घेऊन कामात कसूर व दिरंगाई करणाऱ्या येथे ड्युटीवर असणाऱ्या सेक्युरिटी वर कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकातून व भाविकातून केली जात आहे व कर्तव्यदक्ष सेक्युरिटी येथे नेमावेत अशी मागणी शहरातील नागरीकातून व भाविकानून केली जात आहे.