माजी सैनिकांसाठी नागरी संरक्षण दलात स्वयंसेवक म्हणून संधी

माजी सैनिकांसाठी नागरी संरक्षण दलात स्वयंसेवक म्हणून संधी १४ मेपर्यंत नोंदणीचे आवाहन
उपसंपादक राहुल कांबळे
धाराशिव, दि.१३ मे आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी नागरी संरक्षण दलाला बळकट करण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने निर्देश दिले असून,त्यानुसार सैनिक कल्याण विभाग,पुणे यांच्या माध्यमातून माजी सैनिकांना नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिकांनी आपले नाव,पत्ता व संपर्क क्रमांकासह दिनांक १४ मे २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,धाराशिव येथे नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.माजी सैनिकांचा अनुभव नागरी संरक्षण दलासाठी उपयुक्त ठरणार असल्यामुळे ही नोंदणी महत्त्वाची आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०२४७२-२२२५५७ किंवा मोबाईल क्रमांक ७५८८५२७५५४ वर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.