न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूर पुन्हा शिवसेनेकडे? धनुष्यबाण चिन्हावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय प्रवक्ते ॲड योगेश केदार?

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूर पुन्हा शिवसेनेकडे? धनुष्यबाण चिन्हावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय प्रवक्ते ॲड योगेश केदार?

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

सामाजिक चळवळीतून महाराष्ट्रभर नावारूपाला आलेले योगेश केदार हे अनेक महिन्यांपासून जिल्ह्यातील विकास कामे मंजूर करून आणल्यामुळे मोठ्या प्रमाणावर चर्चेत होत आहे. मराठा समाज आरक्षण चळवळ पुन्हा उभी करण्यात त्यांच्या वनवास यात्रेचा मोठा वाटा आहे. त्यामुळे मराठा समाजात त्यांच्या विषयी मोठी आत्मीयता आहे. मागच्या पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून धाराशिव येथील धनगर समाजाचे उपोषण त्यांनी यशस्वी पद्धतीने सोडवले. थेट आंदोलकांशी मुख्यमंत्र्यांचे फोनवर बोलणे घडवून दिले. मराठा समाजातील या तरुण नेत्याने धनगर बांधवांची मने जिंकली. ओबीसी-मराठा दोन्ही समाजात त्यांचे राजकीय प्रस्थ चांगलेच वाढले आहे. सध्या मराठवाड्यात विस्थापित मराठ्यांची चळवळ अत्यंत संवेदनशील झालेली आहे. त्यातून एक विस्थापित चेहरा देऊन संपूर्ण मराठवाड्यात वेगळा संदेश देण्याची भूमिका मुख्यमंत्री घेऊ शकतात.

गल्ली ते दिल्ली दांडगा संपर्क असलेले योगेश केदार आहेत. राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांसोबत त्यांचे उत्तम संबंध वेळोवेळी दिसून येतात. दिल्लीत देखील त्यांनी दहा बारा वर्षे काम केल्याने दिल्ली दरबारी देखील त्यांची चांगली पोहोच दिसून येते. छत्रपती संभाजी राजेंनी या कर्तबगार तरुणाचे गुण हेरून २०१९ विधानसभेचे टिकिट देखील मागितले होते.  राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला. धाराशिव कळंब मतदारसंघ ओमराजे आणि तानाजी सावंत यांनी सोडण्यास नकार दिल्याने पाटील यांना तुळजापूर येथे टिकिट दिले गेले. अन्यथा योगेश केदार यांनी त्याहिवेली मतदारांमध्ये कुतूहल निर्माण केले होते. त्यानंतर सलग त्यांनी कामे करत राहिल्याने पुन्हा ते चर्चेत आले आहेत.

धाराशिव शहरात १४० कोटी रुपये विकास निधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यातून आणला. संपूर्ण मराठवाड्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. अन् तो यशस्वी देखील होण्याच्या मार्गावर आहे.

सोलापूर – तुळजापूर – धाराशिव हा रेल्वे मार्ग त्यांच्या पाठपुरावा मुळेच मंजूर झाला आहे. 2018 मध्ये तश्या बातम्याही सर्व वर्तमान पत्रानी केल्या होत्या. नंतर ते रेल्वे समितीवर सदस्य देखील राहिले. अन् उर्वरित अडचणी सोडवून मंजुरी आणली. सोलापूर तुळजापूर धाराशिव हा प्रकल्प मार्गी लावण्यात त्यांचे असलेले योगदान कुणीही नाकारू शकत नाही. धाराशिव शहरात पासपोर्ट कार्यालय देखील त्यांचीच देण आहे. असे अनेक विकासकामे त्यांनी केली असल्याने. विकास जिल्ह्यातील विकास कामांकडे बघण्याचा त्यांचा व्यापक दृष्टिकोन दिसून येतो.

लाडकी बहिण योजनेतील त्रुटी ओळखून सरकार कडून तश्या उपाय योजना करून घेतल्या. सारथी बार्टी महाज्योती या सर्व जातींच्या पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 500 कोटी रुपये मंजूर करण्यात त्यांनी भूमिका निभावली. त्यामुळे राज्यातील उच्च शिक्षित तरुण पिढी मध्ये त्यांच्याकडे आशास्थान म्हणून पाहिले जात आहे. महावितरण असेल किंवा एमपीएससी परीक्षांच्या तारखा वाढवून घेत तरुणांना दिलासा दिला.

ST कामगारांना महावितरण प्रमाणे पगारवाढ मिळावी यासाठी देखील त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिल्याने बहुजन समाजात देखील आपुलकी मिळवली.

तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी या छोट्याश्या खेडेगावातून शेतमजूर असलेल्या कुटुंबातून येणारे योगेश केदार हे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उदयाला येत आहे. अश्या कर्तबगार तरुण चेहऱ्याला विधानसभा निवडणुकीत संधी देऊन एकनाथ शिंदे हे एकाच दगडात अनेक पक्षी मरण्याच्या बेतात आहेत. बाळासाहेब ठाकरे हेही असेच सामान्य घरातील तरुणांना संधी द्यायचे. त्याप्रमाणे एकनाथ शिंदे हे तसा निर्णय घेऊ शकतात.

त्यांच्यापुढे तुळजापूर मतदारसंघ पुन्हा धनुष्य बानाकडे सोडवून घेण्याचे खरे आवाहन असेल. विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील हे तुळजापूर येथे ऐनवेळी आलेले आयात उमेदवार आहेत. त्यांचा मूळ मतदार संघ हा धाराशिव कळंब असून ते पुन्हा आपल्या मूळ मतदारसंघात गेले तर ही तुळजापूर ची जागा शिवसेनेला सहज सुटू शकते. १९९५ मध्ये बाळासाहेबांनी तुळजापूर वर शिवसेनेचा भगवा फड़कवन्याचे स्वप्न पाहिले होते. स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणारे एकनाथ शिंदे हे तुळजापूर वर दावा करू शकतील अशी चिन्हे आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे