शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयातील प्रा.नितीन अष्टेकर यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार..
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शारिरीक शिक्षण निर्देशक प्रा. नितीन अष्टेकर हे नियतवयोमानानुसार दि.३१;जुलै रोजी निवृत्त झाले.त्या निमित्त त्यांना महाविद्यालयाच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करून निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय शिक्षण संस्था अध्यक्ष रमेशराव पाटील हे होते. प्राचार्य डॉ.शेषेराव जावळे पाटील,संस्थेचे संचालक जनार्दन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संस्थेच्या वतीने प्रा.नितीन अष्टेकर यांचा शाल श्रीफळ बुफे,छ्त्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने अंकुश शिंदे आणि काकासाहेब आनंदगावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
कार्यक्रमा चे सूत्रसंचालन डॉ. शिवाजी कदम यांनी केले तर डॉ. प्रभाकर गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.