न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगरसेवक कसा असावा….? जनसेवक अमोल कुतवळ यांचा अभिप्राय

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

नगरसेवक कसा असावा….? जनसेवक अमोल कुतवळ यांचा अभिप्राय

ज्ञानेश्वर गवळी

◾कुठल्याही सामाजिक दर्जाच्या पदावर काम करताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या व्यक्तीला लोकांचे प्रश्न सोडविण्याची मनापासून तळमळ असलेले जनसेवक अमोल कुतवळ 

◾ज्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यास सामान्य नागरिकाला त्याच्या नोकरी-धंद्याच्या व्यस्ततेमुळे वेळ नसतो. तिथे जनसेवक अमोल कुतवळ यांनी पूर्ण दिला.

◾उमेदवार शिकलेला असावा किंवा नाही यावर दुमत असू शकेल, पण निश्चितच निवडून आलेल्या उमेदवारात काही जीवनविषयक मूल्ये असावीत.

◾प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, चिकाटी, जनतेच्या पैशाला विश्वस्त म्हणून न्याय देण्याची क्षमता त्याच्यामध्ये हवी.

◾शिक्षण असो किंवा नसो नगरसेवकाकडे वेळेचे व्यवस्थापन हे उत्कृष्ट असलेच पाहिजे.

◾निरर्थक गोष्टींमध्ये वेळ न घालवता आपल्या मुदतीत जास्तीत जास्त लोकांची कामे कशी करता येतील, याचे व्यवस्थित ज्ञान त्याच्याकडे असले पाहिजे.

◾नगरसेवकाकडे प्रसंगी परखडपणे मत व्यक्त करण्याची क्षमता असली पाहिजे, जर लोकांच्या भल्याचा असेल तर प्रसंगी पक्षश्रेष्ठींचा आदेश धुडकावून निर्णय घेतला पाहिजे.

◾राजकारण हे जरी व्यवस्थेचे मूलभूत अंग असले, तरी उपलब्ध असलेल्या वेळेपैकी किती वेळ राजकारणात घालवायचा व किती वेळ लोकांसाठी द्यायचा, याचा निश्चित आराखडा त्याच्याकडे असला पाहिजे.

◾याव्यतिरिक्त निवडून आल्यावर मिळणारी प्रसिद्धी व पैसा याचा मर्यादित उपभोग नगरसेवकाने घेतला पाहिजे.

सुजाण नागरिकांनो मतदान अवश्य करा परिवर्तनासाठी, आयाराम गयारामांना प्रतिबंध करण्यासाठी, लोकशाही खऱ्या अर्थाने सुदृढ करण्यासाठी!आणि नीतिमान राजकारणाला नवं स्वरूप देण्यासाठी जनसेवक अमोल कुतवळ यांचा अभिप्राय यावेळी व्यक्त केला.

✍️पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे