दोन गटातील जबरी मारहाण प्रकरणातील ३०७ गुन्हा (एफ.आय.आर ) उच्च न्यायालयाकडून रद्द
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

दोन गटातील जबरी मारहाण प्रकरणातील ३०७ गुन्हा (एफ.आय.आर ) उच्च न्यायालयाकडून रद्द
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील काडगाव नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गाजलेले प्रकरणी हिंदू – मुस्लिम गटातील भांडण कुराड तलवारीने मारहाणकरत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकमेका विरोधात दाखल गुन्हा क्रमांक १८६ व १८७ प्रकरणी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
दाखल झालेल्या गुन्ह्यात सात आरोपीचा यापूर्वीचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे आपोपी तर्फे अँड दिगंबर भाकरे,अँड,अभिजीत मोरे, अँड शिवाजी नाईकनवरे , अँड समाधान गोरे, अँड तोफिक शेख यांना दाखल केले होते सदर प्रकणी एकून ७ आरोपींना मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाकडून तात्काळ अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.
दोन्ही गटातील वकिलाचा युक्तिवाद ऐकून सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा न्याय निकाल करत सदरचे भादवि कलम ३०७ अन्वे गंभीर स्तराचा गुन्हा रद्द झाल्याबाबतचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश धाराशिव तसेच नळदुर्ग पोलीस स्टेशनला देण्यात आला आहे.