तुळजापूर ड्रग्जप्रकरणी पोलिसांचा तपास योग्य दिशेनेच कुणालाही सोडणार नाही – तपास अधिकारी गोकुळ ठाकुर
तपास अधिकारी गोकुळ ठाकुर तामलवाडी पोलिस ठाणे

तुळजापूर ड्रग्जप्रकरणी पोलिसांचा तपास योग्य दिशेनेच कुणालाही सोडणार नाही – तपास अधिकारी गोकुळ ठाकुर
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
सध्या राज्यभर गाजत असलेल्या ड्रग्जप्रकरणी १५ आरोपींना अटक केली असुन २१ जण फरार आहेत. त्या आरोपींचा शोध चालु आहे. पोलिसांचा तपास योग्य दिशेनेच चालु आहे या ड्रग्जप्रकरणी जो कोणी दोषी आढळेल त्याला सोडले जाणार नाही मग तो कोणीही असो असे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांनी बोलताना सांगितले.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण हे राज्यासह देशभरात गाजत असुन या ड्रग्जतस्करीत एकुण ३६ आरोपी आहेत. या ड्रग्जप्रकरणी पोलिसांनी सोलापूर,पुणे, मुंबई,धाराशिव अशा विविध ठिकाणावरून आरोपींना अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणातील ३६ आरोपींपैकी १५ जणांना पोलिसांनी अटक केली असुन २१ आरोपी फरार आहेत. या प्रकरणी पोलिसांनी १० हजार ७४४ पानी दोषारोपपत्र दाखल केले असुन आरोपीवर संगणमताने ड्रग्ज खरेदी, विक्री, ड्रग्ज साठवणुक,ड्रग्जविक्रीतुन बेकायदेशीर अर्थिक फायदा घेऊन अवैध संपत्ती कमावणे, ड्रग्ज सेवन करणे असा ठपका ठेवून कार्यवाही करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध सुरू असुन फरार आरोपींच्या नातेवाईकांना तामलवाडी पोलिस ठाण्यात बोलावुन खोलवर तपास करण्यात येत आहे .फरार आरोपींचे नातेवाईक कुठल्या राज्यात,जिल्ह्यात आहेत त्यांची इत्यंभूत माहिती फरार आरोपींच्या नातेवाईकांकडुन तसेच मित्रांकडून घेतली जात आहे. तसेच पुणे येथील फरार आरोपी अटक करण्याच्या अनुषंगाने आरोपींचे नातेवाईक, मित्र अशा सर्वांची चौकशी करण्यासाठी त्यांना तामलवाडी पोलिस ठाण्यात बोलावुन घेऊन सखोल चौकशी करण्यात येत असून कुणालाही व्ही आय पी ट्रीटमेंट देण्याचा प्रश्नच येत नाही असे सपोनि गोकुळ ठाकुर यांनी बोलताना सांगितले. तसेच तुळजापूर ड्रग्जप्रकरणी पोलिसांचा तपास योग्य दिशेनेच चालु असुन लवकरच फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत तसेच या ड्रग्जप्रकरणी कुणालाही सोडले जाणार नाही मग तो कोणीही असो असे तपास अधिकारी तथा तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांनी शिवरत्न न्यूजशी बोलताना सांगितले. तसेच हा तपास पोलीस अधिक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, व जिल्हा सरकारी वकील महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चालु आहे व यांच्या मार्गदर्शनाखालीच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असल्याचेही गोकुळ ठाकुर यांनी सांगितले