उस्मानाबाद जनता सहकारी बँकेची कर्जदारांची अनावश्यक विमा पॉलिसीद्वारे लुट… !
जनता बॅंकेच्या आर्थिक कर्ज गैरकारभाराविरुद्ध लगाम कोण लावणार ?

उस्मानाबाद जनता सहकारी बँकेची कर्जदारांची अनावश्यक विमा पॉलिसीद्वारे लुट… !
जनता बॅंकेच्या आर्थिक कर्ज गैरकारभाराविरुद्ध लगाम कोण लावणार ?
नळदुर्ग : प्रतिनिधी
उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि. उस्मानाबाद (धाराशिव) ही बॅंक जिल्ह्यातील लोकांच्या आर्थिक सोयीसाठी सहकारी तत्वावर चालणारी बॅंक म्हणून स्थापन झाली परंतु अलीकडच्या काळात बॅंकेच्या आर्थिक हव्यासामुळे उस्मानाबाद जनता बॅंक म्हणजे एकप्रकारची खासगी सावकारी बॅंक अशी प्रतीमा तयार झाली आहे विना सहकार नही उद्धार या उक्तीप्रमाणे बॅंकेचे कामकाज चालणे अपेक्षीत असताना प्रत्यक्षात विना सहकार खासगी सावकार अशी अवस्था जनता बँकेची झालेली आहे कारण की सदर बॅंक ही तीच्या प्रचंड व्याजदरासाठी नावारूपाला आलेली असुन कोणत्याही बॅंकेचे कर्ज कर्जदार फेडु शकतो परंतु जनता बॅंकेचे कर्ज कधीच फिटु शकत नाही अशी परिस्थिती बॅंकेच्या आताताई वागण्यामुळे दिसुन येत आहे अणदूर येथील पत्रकार (संपादक ) सोमनाथ काशीनाथ बनसोडे यांनी व्यवसाय वाढीसाठी त्यांच्या समर्थ फुटवेअर या दुकानावर उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे कर्ज काढले व कर्जाचे काही हप्तेही वेळेवर भरले परंतु अचानक कोवीड लॉक डाउन मुळे त्यांचे दुकान बंद झाले व धंदा ठप्प झाला त्यांना करोनामुळे नाईलाजाने धंदा बंद करावा लागला व दुकान बंद झाले परंतु जनता बॅंकेने त्यांच्या बंद झालेल्या दुकानावर अनेक वेळा इन्शुरन्स पॉलिसी उतरावुन त्या पॉलीसी चे लाखो रुपये बिल वेळोवेळी कर्जामध्ये समाविष्ट करुन त्यांची आर्थिक लुट केली प्रत्यक्षात दुकानच कोवीडमध्ये बंद झाले हे जनता बॅंकेला माहीती असतानासुद्धा आर्थिक गैरव्यवहार करण्याच्या उद्देशाने अस्तित्वात नसलेल्या दुकानाचे इन्शुरन्स अनेक वेळा उतरवीण्याचा महाप्रताप जनता बॅंकेने करुन कर्जदार यांचेवर कर्जाचा कधीही न फिटणारा डोंगर उभा केल्याचे स्पष्टपणे दिसुन येत असुन त्यावीरोधात पत्रकार सोमनाथ बनसोडे यांनी वेळोवेळी बॅंकेकडे विचारणा केली असता बॅंकेने खासगी सावकाराप्रमाने उलटसुलट उत्तरे देऊन त्यांची फसवणुक केलेली आहे.या अन्यावीरोधात कर्जदार सोमनाथ बनसोडे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना तक्रार केलेली असुन झालेल्या अन्यायावीरोधात न्याय मागीतला असुन सदर प्रकरणात न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे परंतु मुळातच जनता बॅंक ही गेंड्याच्या कातडी पांघरलेली बॅंक असुन बॅंक फक्त कर्जदारांना व्याजावर व्याज म्हणजेच चक्रवाढ व्याज वसुली करते व एक प्रकारची कायदेशीर मान्यताप्राप्त खासगी सावकारी बॅंक असुन फक्त रझाकारी पद्धतीने कर्जदारांना व्याजावर व्याज आकारणी करुन त्यांची गहाण मालमत्ता ताब्यात घेऊन त्याचा निलाव करुन आपलं आर्थिक हीत साधते हाच जनता बॅंकेचा इतीहास सर्वश्रुत असुन जिल्हाभरात हाच नावलौकिक बॅंकेच्या नावावर आहे असे अनेक कर्जदार जनता बॅंकेने कायमचे संपवील्याचे अनेक प्रकरणे जिल्हाभरात याआगोदर घडलेली असुन जनमानसात खासगी सावकारी बॅंक अशी प्रतीमा जनता बॅंकेची झालेली असुन बॅंकेच्या आर्थिक कर्ज गैरकारभाराविरुद्ध लगाम कोण लावणार असा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला असून तक्रारदार सोमनाथ बनसोडे यांनी लवकरच जनता बॅंकेच्या अन्यायावीरोधात लवकरच रिजर्व बॅंक ऑफ इंडिया यांचेकडे पुराव्यासहीत तक्रार दाखल करुन बॅंकेचे लायसन्स रद्द करण्याची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.