उपसंपादक राहुल कांबळे
धाराशिव ९ मे जिल्ह्यात सण-उत्सव,धार्मिक कार्यक्रम,तसेच विविध मागण्यांसाठी आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेता,जिल्हा प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १३ मे २०२५ रोजीच्या रात्री १ वाजतापासून ते २६ मे २०२५ रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू केले आहेत.
अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांनी हा आदेश काढला असून,या काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांचा जमाव, शस्त्र,काठ्या,दाहक पदार्थ,स्फोटके, दगड,विडंबनात्मक साहित्य,प्रक्षोभक भाषणे,घोषणा,मिरवणुका व मोर्चे इत्यादींवर बंदी घालण्यात आली आहे.
हा आदेश धार्मिक विधी,अंत्ययात्रा, लग्नसमारंभ,शासकीय कार्यक्रम, सिनेमागृह व रंगमंच यांना लागू होणार नाही.तसेच शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना यामधून वगळण्यात आले आहे.या काळात कोणताही मोर्चा,सभा,प्रचार किंवा आंदोलन आयोजित करावयाचे असल्यास जिल्ह्यातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यात श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती,मराठा व ओबीसी आरक्षण,वक्फ कायदा,शेतकरी मागण्या आदी मुद्द्यांवर आंदोलन होण्याची शक्यता असल्याने, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा आदेश लागू करण्यात आला आहे