तुळजापुर ड्रग्ज प्रकरण, तीन आमदारांच्या आश्रयानेच ड्रग्ज विक्री, सामाजिक कार्यकर्त्यांचा पोलीसांना स्फोटक जबाब ?
स्फोटक जबाबाचा विशाल छत्रे यांनी केला भांडाफोड माने विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तुळजापुर ड्रग्ज प्रकरण, तीन आमदारांच्या आश्रयानेच ड्रग्ज विक्री, सामाजिक कार्यकर्त्यांचा पोलीसांना स्फोटक जबाब !
स्फोटक जबाबाचा छत्रे यांनी केला भांडाफोड माने विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापुर ड्रग्ज प्रकरणात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांनी पोलीसांना दिलेल्या जबाबाने खळबळ उडली आहे. माने यांनी आपल्या जबाबात थेट स्थानिक आमदार राणाजगजितसिंह पाटिल यांच्यावरच गंभीर आरोप केले असून त्यांच्या राजकिय आश्रयामुळेच विनोद (पिट्या) गंगणे आणी विशाल छत्रे यांचा ड्रग्ज विक्रीचा धंदा फोफावला आणि पोलीस यंञणा त्यांच्यापर्यंत पोहचू शकली नाही. असा दावा केला आहे. माने यांनी दि.५ एप्रिल २०२५ रोजी तामलवाडी पोलीसांच्या नोटीसनुसार हा जबाब नोंदविला. तसेच विशाल छत्रे हे ड्रग्ज चा व्यवसाय करीत आहेत असे नमुद केले आहे. सदर व्हॉटसॉप ग्रुपवर प्रसारित करून राजाभाऊ दिगंबर माने यांनी जबाब व त्यावर त्यांची सही राजाभाऊ दिगंबर माने यांच्या नावाची तसेच समक्ष म्हणुन सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर पोलीस ठाणे तामलवाडी असे जबाब एका न्युवर प्रसारीत झाले होते पत्रकारांनी बातमी प्रसारित करण्यासाठी छत्रे यांना फोन करून त्यांचा अभिप्राय घेण्याचा प्रत्यन केला मात्र छत्रे म्हणाले म्हला यावर काही अभिप्राय द्यायचा नाही.छत्रे यांनी तामलवाडी पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नं.२२/२०२५ ड्रग्जच्या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता सदर गुन्ह्याचे दोषारोपपञ मा.न्यायालयात दाखल झाले असले बाबतची माहीती मिळाली. सदर गुन्ह्यातील आरोपी युवराज देविदास दळवी यांचे वकिल अंगद पवार रा. काक्रंबा यांचेकडे असलेले दोषारोप पत्राची प्रत पाहुन राजाभाऊ माने यांचा जबाब पोलीसांनी घेतलेला आहे का, व त्या कागदपत्रामध्ये आहे का याबाबत विचारणा केली असता त्यांनी दोषारोप पत्रामधील कागदपञाची पडताळणी करून राजेंद्र माने यांच्या जबाब कागदपञामध्ये नसल्याची माहीती दिली. स्वःता छत्रे यांनी कागदपत्रे पाहीली. त्यामध्ये राजाभाऊ माने यांच्या जबाब त्यांना दिसून आला नाही.
तरी राजेंद्र माने यांनी पोलीसा समक्ष कोणताही जबाब दिला नसताना व चार्जशिटमध्ये समाविष्ठ नसतानाही पोलीसा समक्ष जबाब दिलेला आहे. विशाल छत्रे यांचा ड्रग्ज प्रकरणामध्ये कोणताही सहभाग नसताना त्यांच्याविरूद्ध खोटा पुरावा जबाबाच्या माध्यामातुन तयार करून तो खोटा आहे हे माहीत असतानाही न्यूजवर व व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित करून ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यासाठी खोटी कागदपञ तयार करून,व्हाट्सअप ग्रुप वर प्रासारित करून बदनामी केल्या प्रकणी विशाल छत्रे यांच्या फिर्यादीवरून कलम ३३५,३३६,३३७,३४९,३४० प्रमाणे तुळजापूर पोलीस ठाण्यात राजाभाऊ माने यांच्याविरोध गुन्हा दाखल पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे हे करीत आहेत.