तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, सुविधा व स्वच्छतेची पाहणी केली.
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, सुविधा व स्वच्छतेची पाहणी केली.
तुळजापूर : प्रतिनिधी
विशेष उल्लेख करावासा वाटतो, की MD मेडिसिन असलेल्या डॉ. (श्रीमती) अंजली गाटे या अत्यंत अल्प पगारात देखील दर्जेदार आणि समर्पित सेवा देत आहेत. त्यांच्या या सेवाभावी कार्याचे मनापासून कौतुक केले. तसेच कोविड सेंटरच्या कालावधीमध्ये डॉक्टर गडेकर यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल व अनमोल सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आलारुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या डायलेसिस सेंटर व ब्लड स्टोरेज युनिटचा आढावा घेतला. रक्त संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी NAT टेस्टिंग करून रुग्णांना रक्तपुरवठा करण्याचा उपक्रम उल्लेखनीय आहे.
प्रत्येक रुग्णाशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. रुग्णालयातील स्वच्छता व सर्वसामान्यांना मिळणाऱ्या सुविधा समाधानकारक असून, लवकरात लवकर उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चोरमले व त्यांची संपूर्ण टीम सतत प्रयत्नशील आहे.
त्यांच्या या कार्यासाठी डॉ. चोरमले व सर्व सहकारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा! त्यावेळेस शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शामलताई पवार .माजी नगरसेवक राहुल कपले .नवनाथ जगताप .अनमोल साळुंखे .अर्जुन आप्पा साळुंखे .श्याम पवार .सागर इंगळे .चेतन बडगर. दिनेश रसाळ. बापूसाहेब नाईकवाडी. प्रेम कदम. इत्यादी उपस्थित होते