न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अवघ्या १५ दिवसांत बी.आर.एस पक्ष सोशल मिडीया मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरांत सोशल मीडिया चे राष्ट्रीय प्रभारी जयंत देशमुख व टीमची कौतुकास्पद कामगिरी

अवघ्या १५ दिवसांत बी.आर.एस पक्ष सोशल मिडीया मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरांत

सोशल मीडिया चे राष्ट्रीय प्रभारी जयंत देशमुख व टीमची कौतुकास्पद कामगिरी

तुळजापूर /न्यूज सिक्सर
भारत राष्ट्र समिती( BRS ) पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री तथा BRS पक्षाचे सर्वेसर्वा के . चंद्रशेखर राव यांनी गेल्या कांही महिन्यांपासून मोठे प्रयत्न सुरु केले आहेत . दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने के . चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे .
त्यादृष्टीने मोठी अभ्यासपूर्ण व्यूहरचना आखली जात आहे . नुकतेच नांदेड येथे महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजीत करण्यात आले होते . यावेळी या प्रशिणार्थी पदाधिकाऱ्यांना आपल्या विधानसभा मतदारसंघातील बी आर एस पक्षाची सदस्य नोंदणी करून घेण्यासाठी प्रत्येकी एक सॅमसंग कंपनीचा टॅब देण्यात आला .या सर्व बाबतीत सिंहाचा वाटा म्हणजे सोशल मिडीयाचा . पक्षाच्या राष्ट्रीय सोशल मिडीया चे प्रभारी म्हणून के चंद्रशेखर राव यांनी नुकतीच याअगोदर आप या पक्षाच्या सोशल मिडीयाची जबाबदारी उत्तमपणे सांभाळलेले जयंत देशमुख यांची नियुक्ती केली आहे .
जयंत देशमुख यांच्या टीममधील त्यांचे सहकारी उदयराव घाटगे, शशिकांत ससाणे, प्रकाश चव्हाण, चिन्मय जोशी हे देशमुख यांच्या खांद्याला खांदा लावुन प्रचंड तळमळीने काम करीत आहेत तर सोशल मिडीया टीमचे इतरही सर्व पदाधिकारी दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडत आहेत .
अवघ्या १५ दिवसांत जयंत देशमुख यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या सोशल मिडीयाचे जाळे पसरविले असून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय टीम उभी केली आहे . देशमुख यांनी यामध्ये तरुणांना सामिल करून घेत असताना, त्यांच्या मुलाखती घेवुन त्याची स्क्रिनिंग करून पारदर्शक पद्धतीने त्यांना जिल्ह्याच्या सोशल मिडीया टीममध्ये नियुक्त केले आहे .
त्यामुळे आगामी काळात BRS पक्ष सोशल मिडीयामध्ये सगळ्यांत मजबूत पक्ष म्हणून निश्चितपणे नावारूपांस आल्याशिवाय राहणार नाही .
पक्षाची ध्येयधोरणे, के. चंद्रशेखर राव यांचे विचार, तेलंगणा राज्यामध्ये विशेषतः शेतकरी व समाजातील सर्व घटकांसाठी सुरु असलेला विकास, अनेक लोककल्याणकारी योजना यामध्ये, रयथु बंधु, रयथु विमा, प्रत्येक घराघरांत पिण्याचे स्वच्छ आणि मुबलक पाणी, शेतकऱ्यांना मोफत आणि उच्च दाबाची वीज, शेतीला पाणी, शेतकर्यांना पेरणी व बि बियांणां साठी आर्थिक मदत यांसह तेलंगणा राज्याचा कायापालट, के चंद्रशेखर राव यांनी कसा केला ? तेलंगणा राज्य देशात मॉडेल बनवून नावारूपास कसे आणले ? हे सर्व संबंध महाराष्ट्रातील जनतेपर्यंत व घराघरांत पोहोचविण्याचे मोठे कार्य ही सोशल मिडीया टीम मोठ्या जिद्दीने करित आहे .
“”””””””””””””””””””””””””””””””””””
आगामी काळात तेलंगणा मॉडेल कसे आहे ? ते संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व पक्षनोंदणी याबाबतीत आम्ही सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणावर करित असून यामुळे या पक्षाकडे दररोज लाखोंच्या संख्येने तरुण व शेतकरी आकर्षित होत आहेत . लवकरच बी आर एस पक्षाचे सोशल मिडीयाचे जाळे संपूर्ण देशात वाढवणार आहोत . त्यादृष्टीने संघटनात्मक बांधणी सुरु झाली आहे . देशात सर्वात सक्षम असा पर्याय म्हणून बी आर एस पक्ष निर्माण होईल आणि ते करणासाठी सोशल मिडीयाचा सकारात्मक पद्धतीने वापर केला जाईल .
—- *जयंत देशमुख*
(राष्ट्रीय प्रभारी )
सोशल मिडीया, बी आर एस पक्ष
“”””””””””””””””””””””””””””””””””””

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे