न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

भाजी विक्रेत्याचा मुलाने केली यूपीएससी क्रॅक यूपीएससी उत्तीर्ण सिद्धार्थ भांगेचा पालकमंत्र्यांकडून

भाजी विक्रेत्याचा मुलाने केली यूपीएससी क्रॅक

यूपीएससी उत्तीर्ण सिद्धार्थ भांगेचा पालकमंत्र्यांकडून सत्कार

भविष्यातील वाटचालीस ना. पाटील यांच्याकडून शुभेच्छा

पुणे /न्यूज सिक्सर
पुण्यातल्या एका भाजी विक्रेत्याच्या मुलाने नुकतीच यूपीएससीची सीएसई परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. पुण्यातील खराडी इथे राहणाऱ्या सिद्धार्थ किशोर भांगे याने दुसऱ्याच प्रयत्नात मोठं यश मिळवलं असून, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही त्याचे कौतुक केले. आज आपल्या निवासस्थानी सिद्धार्थचा सत्कार करुन, भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्पर्धात्मक परीक्षांमध्ये UPSC ची नागरी सेवा परीक्षा अर्थात Civil Services सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. या परीक्षेमधील यशासाठी जसे परीक्षार्थीचे बौद्धिक श्रम महत्त्वाचे असतात. तसेच त्याच्या सभोवतालचे वातावरणही महत्त्वाचे असते.

महाराष्ट्रातील यंदाच्या सर्वच यूपीएससी यशवंतांचे कौतुक आहे. मात्र सभोवतालचे वातावरण आव्हानात्मक असतानाही केवळ आपल्या आई-वडिलांवरील श्रद्धा, स्वतःवरील विश्वास आणि आपल्या अभ्यासातील सातत्य यांच्या जोरावर यशश्री खेचून आणणाऱ्या पुण्याच्या खराडी भागातील सिद्धार्थ भांगे याचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक होत आहे.

सिद्धार्थच्या या यशाबद्दल आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही कौतुक केले असून, आपल्या कोथरुड मधील निवासस्थानी भेट घेऊन सत्कार केला. तसेच भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्पर्धात्मक परीक्षांमध्ये UPSC ची नागरी सेवा परीक्षा अर्थात Civil Services सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. लाखो विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर मेहनत घेत असतात. पण सिद्धार्थ भांगे याचे विशेष कौतुक वाटते. कारण, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करुन, त्याने हे यश संपादन करुन, पालकांच्या कष्टाचे खरे चीज केले आहे. त्याने भविष्यातही आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर नावलौकिक कमावावा. सिद्धार्थचे हे यश अनेक तरुणांना प्रेरणा देईल यात शंका नाही, अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, कोल्हापूरच्या विद्या प्रबोधिनीचे संचालक श्री राजकुमार पाटील आणि सिद्धार्थचे पालक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे