भक्ती विठ्ठल राऊत हिने दहावीत मिळवले 93 टक्के गुण
नाभिक समाजातील कन्येच्या यशाचं सर्व स्तरातून होतेय कौतुक

भक्ती विठ्ठल राऊत हिने दहावीत मिळवले 93 टक्के गुण
नाभिक समाजातील कन्येच्या यशाचं सर्व स्तरातून होतेय कौतुक
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तालुक्यातील तिर्थ बुद्रुक येथील एका नाभिक कुटुंबातील कन्या रत्नानी दहावीच्या बोर्ड परीक्षेत तुळजापूर येथील शिंदे हायस्कूलमध्ये तिसरा क्रमांक पटकावत 93.20 टक्के मिळवले आहेत.
भक्तीचे वडील विठ्ठल राऊत हे तिर्थ बुद्रुक आणि बिजनवाडी येथे सलून व्यवसाय करतात.आई रेश्मा राऊत या आपल्या तिन्ही मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मेहनत घेतात. दैनंदिन बस प्रवास करत जिद्दीने भक्ती विठ्ठल राऊत हिने उत्तम यशाला गवसणी घातली आहे.
दि.१३ मे रोजी मंगळवारी इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये कु.
भक्ती विठ्ठल राऊत या तिर्थ बुद्रुकच्या कन्येला दहावीत 500 गुणांपैकी 466 गुण पटकावले आहेत म्हणजेच 93.20 % टक्के गुण मिळविल्याबद्धल गावातील जेष्ठ मंडळी,नातलगांतुन,नाभिक समाज बांधवांकडुन तसेच शालेय स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.