गोरसेनेचे जळकोट येथे रस्ता रोको आंदोलन

गोरसेनेचे जळकोट येथे रस्ता रोको आंदोलन
जळकोट /न्यूज सिक्सर
राजपूत भामटा समाजातील मूळ लाभार्थ्यांचे आरक्षण अबाधित ठेवण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी संदेश चव्हाण यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गोरसेनेच्या वतीने तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
14 मे 2023 रोजी चिखली मतदार संघाच्या आमदार श्वेता महाले यांनी सभागृहामध्ये राजपूत भामटा समाजातील भामटा हा शब्द वगळण्याची मागणी सभागृहात केली. या निर्णयामुळे बंजारा,गोर समाजाच्या शैक्षणिक आणि येत आहे.शासनाने तात्काळ भामटा हा शब्द वगळण्यात आला मूळ समाजाचे आरक्षण आबादीत ठेवावे अशी मागणी या रास्ता रोको आंदोलनातून करण्यात आली. मुंबई – हैदराबाद महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये गोर – बंजारा समाजातील तरुणांची महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होती आंदोलनापूर्वी जळकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर हलगी निनादांमध्ये मोर्चेकरी जळकोट बस स्थानक परिसरात दाखल झाले. राज्यातील 27 जिल्ह्यामध्ये 242 ठिकाणी एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन केले जात असल्याची माहिती आंदोलन कर्त्याच्या वतीने यावेळी देण्यात आली.
नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या वतीने रास्ता रोको मार्गावर चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. संदेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बहूजन योद्धा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे, गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव, तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश चव्हाण, मोहन राठोड,दिलीप आडे,कालिदास चव्हाण,मधुकर जाधव,जगन्नाथ चव्हाण, आप्पासाहेब राठोड,राजू चव्हाण, लालसिंग राठोड यांच्यासह गोरसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते