
लोहारा-प्रतिनिधी
शंकरराव जावळे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, लोहारा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.यावेळी लोहारा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष आयुब शेख यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डॉ शेषेराव जावळे पाटील यांनी दोनही महापुरुष यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल मार्गदर्शन केले. या प्रसंगी श्री रहेमान मुल्ला,प्रा.डॉ.विनायक पाटील, श्री. मनोज पाटील,डॉ. प्रभाकर गायकवाड, प्रा.डॉ. बालाजी राजोळे प्रा.डॉ.मोटे भैरवनाथ , प्रा डॉ शिवाजी कदम प्रा डॉ सुदर्शन सोनवणे,प्रा.डॉ.रामहरी सुर्यवंशी, प्रा. दत्ता कोटरंगे, डॉ.मनोज सोमवंशी डॉ.रामेश्वर धप्पाधुळे,डॉ.संदीप कोरेकर, डॉ. सुर्यकांत बिराजदार, डॉ. विनोद आचार्य प्रा. प्रियंका गिरी, श्री.सगर बालाजी, श्री प्रविण पाटील, प्रकाश राठोड,संजय फुकटे, परमेश्वर कदम यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.