ब्रेकिंग
आदर्श शाखा अभियंता पुरस्कार मिळाल्याबद्धल राजेंद्र माळी यांचा परिवाराच्यावतीने सत्कार
Post-गणेश खबोले

लोहारा(इकबाल मुल्ला)
लोहारा तालुक्यातील फणेपुर येथील लोहारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त शाखा अभियंता राजेंद्र माळी यांना बहूजन रयत परिषदेचा आदर्श शाखा अभियंता पुरस्कार मिळाल्याबद्धल यांचा मित्र परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा लोहारा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, ज्येष्ठ पत्रकार बालाजी बिराजदार, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, ओबीसी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी चव्हाण, मिलाप मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष दादाभाई मुल्ला, किरण माळी, अस्लम आत्तार, खाशिम मुल्ला, अदि उपस्थित होते.