उघडकीस न आलेल्या खुन प्रकरणातील घटनास्थळाला व फिर्यादीला जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची भेट
Post-गणेश खबोले

धाराशिव-प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील पोलिस ठाणे मुरुम येथे दि.19/06/2024 मध्ये फिर्यादी नामे नामदेव अंबादास मुद्दगोळ रा. कोथळी यांनी त्यांची 08 वर्षाची मुलगी भुमिका नामदेव मुहगोळ हौस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन अपहरण केले बाबत गुरनं. 156/2024 कलम 363 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेत असतांना दि.28/06/2024 रोजी मुलीचा मृतदेह तिचा खुन करुन अर्धवट अवस्थेत पुरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याने सदर गुन्ह्यात कलम 302, 201 भादवी प्रमाणे कलम वाढ करुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास तत्कालिन पोलिस अधिक्षक अतुल कुलकणी यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा, धाराशीव यांच्याकडे देण्यात आला होता.
परंतु, अद्यातपावेतो सदर गुन्हा उघड न झाल्याने दि.13/05/2025 रोजी पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी वरील उघडकीस न आलेल्या खुन प्रकरणात कोथळी येथील घटनास्थळावर जाऊन फिर्यादीशी संवाद साधत घटनास्थळाची पाहणी केली. तसेच फिर्यादी, पोलिस पाटील व नागरीकांशी संवाद साधत संशयिताकडे चौकशी करुन गुन्हा लवकरच उघडकीस आणला जाईल असे आश्वासित केले आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार व मुरुम पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप दहीफळे यांना तपासाबाबत योग्य त्या सुचना दिल्या.सदर घटनेतील आरोपी बाबत कोणाला काही माहिती असल्यास आम्हाला कळवा असे पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी नागरीकांना आवाहन केले आहे.