न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

हैद्राबाद मुक्ती संग्राम पुस्तकाचे १७ सप्टेंबर रोजी प्रकाशन

Post-गणेश खबोले

 

हायस्कुल लोहारा माजी विद्यार्थ्यांचा संवाद मेळाव्यात प्रकाशन

लोहारा-प्रतिनिधी

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पुस्तक प्रकाशन व माजी विद्यार्थी संवाद मेळावा दि .१७ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आयोजित करण्यात आला आहे.धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात संपन्न होणार असून या प्रसंगी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमाला लोहारा हायस्कूल शाळेचे माजी विद्यार्थ्यांनी व तसेच नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रतिष्ठानचे बाबुराव माळी व विद्या विकास प्रतिष्ठानचे भारत काळे यांनी केले आहे.
१७ सप्टेंबर १९४८ या दिवशी हैदराबाद संस्थानाला निजामाच्या अंमलाखातून मुक्ती मिळाली त्यापूर्वी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. मराठवाडा ज्यात उस्मानाबाद आजचे धाराशिव बीड परभणी नांदेड व औरंगाबाद आजचे संभाजीनगर या पाच जिल्ह्याचा समावेश होता त्यांना व तेलंगणातील आठ व कर्नाटकातील तीन जिल्ह्यातील लोकांना १७ सप्टेंबर रोजी मोकळा श्वास घेता आला.
मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी अनेक स्वातंत्र्यसेनानी जो लढा दिला आणि आजच्या पिढीला १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिनाची माहिती व्हावी यासाठी या दिनाचे औचित्य साधून श्री बाबुराव पिराजी माळी लिखित हैदराबाद मुक्ती संग्राम या पुस्तकाचें प्रकाशन सोहळा व हायस्कूल लोहारा माजी विद्यार्थी व शिक्षकांचा संवाद मेळावा या कार्यक्रमाप्रसंगी होणार आहे.
या पुस्तक प्रकाशन सोळा प्रसंगी निवृत्त मुख्याध्यापक व साहित्यिक मुंबई विश्वास धुमाळ, विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर डॉ गणपतराव मोरे,सामाजिक कार्यकर्ते तोरंबा विठ्ठल बागल, स्त्री रोग तज्ञ डॉ कार्तिक यादव,आरोग्य अधिकारी डॉ अविनाश ढगे,अध्यक्ष शिक्षण संस्था वृद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ बिजलीनगर चिंचवड पुणे दिलीप चव्हाण, विद्या विकास प्रतिष्ठानचे भारत काळे सह आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी इतिहास तज्ञ लेखक वक्ते भाऊसाहेब उमाटे यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. माजी निवृत्त शिक्षणाधिकारी साहित्यिक लेखक बाबुराव माळी लिखित हैदराबाद मुक्तिसंग्राम या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार असून या प्रसंगी हायस्कूल लोहारा शाळेचे माजी विद्यार्थी शिक्षकांचा संवाद मेळावा देखील पार पडणार आहे. सदर कार्यक्रम सकाळी ११ वाजून ३० मिनिटाला सुरुवात होऊन दुपारी २ वाजता कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे