एकतेचे प्रतीक उदाहरण गणपतीच्या आरतीला डॉ खुसरो एस काझी यांच्यासह मित्र परिवार उपस्थित..

लोहारा-(गणेश खबोले)
लोहारा येथील धर्मगुरूच्या परिवारातील सदस्य लोहारा शहराचे भूमिपुत्र तसेच हैद्राबाद येथे स्थयिक असलेले डायरेक्टर आणि चीफ एक्स ऑफिसर हेल्थ स्मिथ प्रा ली बांगलादेश तसेच भारत,चीफ कोच मॉर्फ प्रौ इन्स्टिटीटूट ऑफ प्रोफेशनल डेव्हलोपमेंट चे डॉ.खुसरो एस काझी यांच्या व मित्र परिवाराच्या उपस्थितीत लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाची श्री ची आरती करण्यात आली.
एक सामाजिक समतेचा संदेश देत हिंदू मुस्लिम एकतेचे समानतेचा व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एक संदेश देत श्रींची मनोभावे आरती करण्यात आली.यावेळी त्यांच्या मित्र परिवारातील शफिक जमादार,विक्रांत संगशेट्टी,प्रमोद पोतदार,दगडू तिगाडे,संतोष माळवदकर, मोहन वचणे,सुजित मशालकर,कैलास माणिकशेट्टी,विजय महानुर उपस्थित होते. यावेळी उपस्थिताचा किंग कोब्रा गणेश मंडळाच्या वतीने शाल फेटा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मंडळाचे अध्यक्ष्य जितेश पुलंकर्ते,उपाध्यक्ष्य देवा महाजन,सचिव ओम पाटील,सतीश ढगे,ईश्वर बिराजदार, महेश चपळे मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.