लोकमान्य युवा मंचच्या वतीने राज्यस्तरीय कराओके गायन, रांगोळी स्पर्धा व रक्तदान शिबीर संपन्न
Post-गणेश खबोले

तुळजापूर-प्रतिनिधी
लोकमान्य युवा मंच, अयोध्या नगर तुळजापूरच्या वतीने गणेशोत्सव 2024 अंतर्गत विविध समाजोपयोगी, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 8 सप्टेंबर रोजी विकसित भारत व जलसंवर्धन या विषयांवर रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भाग घेतला.
रक्तदान हे श्रेष्ठदान असून रक्तदानामुळे लाखों लोकांना जीवनदान मिळते. हे सामाजिक उत्तरदायित्व लक्षात घेवून मंचाच्या वतीने इंडियन रेडक्रॉस सोसायटी, बार्शी संचालित श्रीमान रामभाई शहा रक्त केंद्र यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात ही मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी म्हणून मंचच्या वतीने प्रथमच राज्यस्तरीय कराओके गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये पुणे,छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर, सोलापूर या जिल्ह्यातील 40 स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धकांनी मराठी, हिंदी बहारदार गीते सादर केले.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक तुळजापूर येथील प्रशांत भोसले (तुळजापूर) यांनी पटकावले. श्री.प्रशांत अपराध यांच्या वतीने रोख 5001/- प्रथम पारितोषिक देण्यात आले. द्वितीय पारितोषिक सई अमर कदम (तुळजापूर) यांनी पटकावले. श्री विक्रम पाटील, चेअरमन श्री विट्ठल सहकारी नागरी पतसंस्था यांच्या वतीने 3001/- द्वितीय पारितोषिक देण्यात आले. तृतीय पारितोषिक श्री ज्ञानेश्वर साळवे (छत्रपती संभाजी नगर) यांनी पटकावले. जगदंबा स्टोन क्रशरचे श्री धर्मराज भारत पवार यांच्या वतीने रोख 2001/- तृतीय पारितोषिक देण्यात आले. आरती राठोड (लोहारा) हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या स्पर्धेचे प्रमाणपत्र व ट्रॉफी आदित्य कोचिंग क्लासेसचे संचालक श्री सुरवसे यांच्या वतीने देण्यात आले.
कराओके स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री. वाघमारे सर, श्रीमती कुदळे मॅडम तर रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ.सतीश महामुनी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अशोक चव्हाण सर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गणेश चादरे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. प्रसाद डांगे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा मंचचे अध्यक्ष श्री. नंदकुमार हाजगुडे, उपाध्यक्ष, श्री. राहुल कणे, सचिव श्री.सचिन कोठावळे, कोषाध्यक्ष श्री. आण्णासाहेब कणे, श्रीरंग लोखंडे सर, श्री.बळीराम माने, श्री. दिनेश क्षिरसागर, श्री.अजय कांबळे, श्री अजिंक्य नवले, श्री. ऋषिकेश डांगे,श्री. गुरुप्रसाद भूमकर, श्री. भारत पवार, श्री. शंकर जाधव, श्री. महादेव मुळे, कृष्णा हाजगुडे, हर्षवर्धन चादरे, कृष्णा डांगे, रणवीर साठे, रितेश नाईकवाडी, केदार कोठावळे, हर्ष कोल्हे, शौर्य निकम, रुद्र देशमुख, तन्मय जाधव आदि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.