
लोहारा -प्रतिनिधी
लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर आणि किंग कोब्रा गणेश मंडळाच्या गणपतीची आरती शहरातील पत्रकारांच्या हस्ते करण्यात आली.
पाटोदा रोडवरील महात्मा बसवेश्वर गणेश मंडळाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही चांदीच्या गणेश मूर्ती ची प्राण प्रतिष्ठापना केली आहे. तर शहरातील मुख्य चौकात असलेल्या किंग कोब्रा गणेश मंडळाने १२ फुटी उंचीची मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली आहे.
या आरती वेळी जेष्ठ पत्रकार निळकंठ कांबळे,सा. विकास पर्व संपादक महेबूब फकीर, बालाजी बिराजदार,तानाजी माटे, जसवंतसिंह बायस,अशोक दुबे,अब्बास शेख,सुमित झिंगाडे,गणेश खबोले यांच्यासह महात्मा बसवेश्वर गणेश मंडळ अध्यक्ष वैजिनाथ माणिकशेट्टी, उपाध्यक्ष संतोष फावडे, शशांक पाटील,किंग कोब्रा गणेश मंडळ अध्यक्ष जितेश फुलकुर्ते,शंभुलिंग स्वामी, महेश चपळे, किरण पाटील,संतोष वाघमारे,मैनोद्दीन मोमीन, ओम पाटील,सद्दाम मुलाणी यांच्यासह मंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते…