
लोहारा (प्रतिनिधी)
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली आणि ज़िल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव यांच्या आदेशानुसार लोहारा तालुका विधी सेवा समिती च्या वतीने तालुक्यातील माकणी येथे दि.६ सप्टेंबर रोजी विधी सेवा चिकित्सालयाचे उदघाटन दिवाणी न्यायाधीश क. स्तर लोहारा एस एस कळसकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर लोहारा पी.एस बनकर उपस्थित होते.
या उदघाटन वेळी दिवाणी न्यायाधीश एस एस कळसकर यांनी विधी सेवा चिकित्सालयाबाबत महत्व सांगितले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या कार्यक्रमाची माहिती देशातील तळागाळातील लोकांना व्हावी, विविध योजनाची अंमल बजावणी प्रभावीपणे होण्यासाठी या विधी चिकित्सा लयाची स्थापना करण्यात आली. माकणी येथील विधी चिकित्सालयाचे प्रमुख म्हणून अँड. डी. एस. जानकर यांची नेमणूक करण्यात आली तर स्वयंसेवक म्हणून एन. बी.मोरे यांची नेमणूक करण्यात आली.
सदर विधी चिकित्सालय महिन्याच्या प्रत्येक रविवारी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत चालू राहील.कार्यक्रमास विधीज्ञ मंडळ अध्यक्ष डी.बी.जाधव, एम. डी. घवाळे, विधीज्ञ, माकणी गावातील फुलचंद आळंगे, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष पंडित ढोणे, ग्रामपंचायत सदस्य भास्कर ढोणे, दीपक आळंगे, गोवर्धन आलमले, सरदार मुजावर, भीमराव कांबळे, सचिन ढोणे, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री गोपाळ राजपूत यांच्यासह माकणी येथील व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन अँड एस. जानकर विधीज्ञ यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्तविक अँड एस. बी. मार्डीकर विधीज्ञ यांनी केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अँड पी. एस. मुसंडे यांनी केले.