राज्य स्तरीय क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्काराने सुनंदा निर्मळे यांचा गौरव…
Post- गणेश खबोले

लोहारा (प्रतिनिधी)
शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज अणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते.
२०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे ११० शिक्षक मानकरी ठरले त्यामध्ये लोहारा तालुक्यातील बेलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका सुनंदा निर्मळे यांना ही मुंबई येथे राज्य सरकारने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,शिक्षणमंत्री दिपक केसरकर,प्रधान सचिव,शालेय शिक्षण व क्रीडा विभागवश्रीम.आय.एन.कुंदन,आयुक्त शिक्षण विभाग सुरज मांढरे,ना.मंगलप्रभात लोढा यांच्या सह राज्यभरातील पुरस्कार प्राप्त शिक्षक उपस्थित होते.
सध्या कार्यरत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी तेथील विद्यार्थी,सहकारी शिक्षक व ग्रामस्थ यांना हा पुरस्कार समर्पित करते या सेवेच्या काळात मार्गदर्शन करणारे माझे वरिष्ठ अधिकारी व मला मार्गदर्शन करणारे मित्र परिवार व कुटुंबातील सर्व सदस्य यांचेही मी आभार व्यक्त करते..
निर्मले सुनंदा मधुकर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी
तालुका लोहारा जिल्हा धाराशिव