ब्रेकिंग
काँग्रेसच्या एन.एस.यु.आय जिल्हा उपाध्यक्ष पदी सिराज सिद्धकी,लोहारा तालुकाध्यक्ष पदी अमित विरोधे
Post -गणेश खबोले

लोहारा (प्रतिनिधी)
काँग्रेस कमिटी अंतर्गत धाराशिव जिल्हा विद्यार्थी काँग्रेस (एनएसयुआय) ची कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष अमिर शेख यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष कफील सय्यद यांनी जाहीर केली.यामध्ये लोहारा येथील सिराज सिद्धकी यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी तर लोहारा तालुकाध्यक्ष पदी अमित विरोधे यांची निवड करण्यात आली.
सिराज सिद्धकी यांनी लोहारा युवक काँग्रेस च्या माध्यमातून शहर व परिसरात महाविद्यालयीन कार्यक्रमात सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत.त्यांच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी आणि लोहारा तालुकाध्यक्ष पदी अमित विरोधे यांच्या निवडीचे काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हा सरचिटणीस रौफ बागवान,प्रकाश होंडराव,इस्माईल मुल्लाजी आदींनी शुभेच्छा दिल्या.