
लोहारा (प्रतिनिधी)
लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील शेतकरी दिलीप त्र्यंबक लोभे यांचा मुलगा चैतन्य दिलीप लोभे यांचा पहिल्याच यादीत धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे सरकारी मेडिकल कॉलेज मध्ये MBBS साठी प्रवेश निश्चित झाला आहे.
भारतातून चैतन्य याने ३२७८५ हि रँक मिळवली आहे.मध्यम वर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चैतन्यला लहान पणापासूनच शिक्षणाची आवड आहे.त्याचे ११ वी,१२ वी चे शिक्षण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे झाले आहे.गावातील लोभे कुटुंबातून MBBS होण्याचा पहिला मान चैतन्यला मिळाला आहे.त्यामुळे सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.या यशामागे वडील आणि आई चे परिश्रम आहे.आणि जिद्द या मुळे मी येथे पर्यंत आलो आहे असे चैतन्य म्हणाला.