सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर मुळे यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वतीने सत्कार
पत्रकार गणेश खबोले

लोहारा
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तर्फे श्री सुधाकर काशिनाथ मुळे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.
नियत वयोमानानानुसार सुधाकर मुळे (सह शिक्षक प्रा. शा. नागूर )हे सेवानिवृत्त झाले असले कारणामुळे त्यांचा सेवानिवृत्त सन्मान व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक बायस गुरुजी, टी. के. मक्तेदार, महाराट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष विलास कंटेकुरे, राज्य कार्यकारणी सदस्य कल्याण बेताळे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष शिवाजी कवाळे, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण बनसोडे, जिल्हा प्रवक्ते कमलाकर येणेगुरे, तालुका अध्यक्ष भिमाशंकर डोकडे,विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण, खंडाळकर साहेब, केंद्रप्रमुख नागनाथ जट्टे,दत्तात्रय फावडे, बळीराम आलमले, महादेव गव्हाळे, गौरीशंकर कलशेट्टी,बेडगे सर, दगडू बादुले, कैलास माणिकशेट्टी, मल्लिकार्जुन कलशेट्टी,इंगळे सर, दयानंद क्षीरसागर, उद्धव विभुते,किशोर भोसले, काटमोडे सर, सूर्यकांत वैरागकर, रसूल शेख,कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार आदी शिक्षक उपस्थित होते.