
लोहारा-प्रतिनिधी
गुढीपाडवा या नुतून वर्षांच्या निमित्ताने लोहारा तालुक्यातील हिप्परगा सय्यद येथे कुस्ती मैदान भरविण्यात येते.दि.9 रोजी अतिशय उत्साहाने हा सण साजरा केला गेला.असंख्य कुस्ती मल्ल वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणा वरून आले होते
यावेळी धाराशिव खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ग्रामस्थ देवस्थानाला व कुस्ती मैदानाला भेट दिली सोबत शिवसेना(उबाठ) तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, पवन मोरे उपस्थित होते.
कुस्ती मैदान शुभारंभ करते वेळी उपस्थित मान्यवर संभाजी ब्रिगेड लोहारा तालुका प्रमुख बालाजी भागवत यादव हिप्परगा (सय्यद) सरपंच श्रीशैल ओंवाडे,उपसरपंच गुरूनाथ यादव,चेअरमन नागनाथ पाटील, मेजर शिवानंद ओंवाडे, फुलचंद वाकडे, दयानंद ओंवाडे, शेरखान कारभारी,खंडू गादे,अनिल ओंवाडे व तसेच हिप्परगा सय्यद येथील असंख्य ग्रामस्थ, कुस्ती तील पंच, श्री सय्यद बाशा देवस्थान ट्रस्ट व पैलवान उपस्थित होते.