
लोहारा-प्रतिनिधी
भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त लोहारा शहरात प्रथमच महिलांसाठी भव्य सखी स्मार्ट गृहीणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेत मनोरंजक खेळ – संगीत खुर्ची/तळयात मळयात,उखाणे-शब्द आमुचा उखाणा तुमचा,बकेट मध्ये चेंडू टाकणे,गीत गायन – शब्द आमुचा गीत तुमचे,बौध्दीक -महापुरुषावर आधारीत प्रश्न समाविष्ट आहेत.
स्पर्धेत विजेत्यांना प्रथम बक्षीस -५००० रु व चषक डॉ.रुपाली हेमंत श्रीगिरे (श्रीगिरे हॉस्पीटल लोहारा),द्वितीय बक्षीस ३००० रु व चषक सौ.सुनिता शरद पवार (तुळजाभवानी स्टील सेंटर लोहारा),तृतीय बक्षीस २००० रु व चषक सौ. सारिका मनोहर वाघमोडे (जगदिश भैय्या बाघमोडे प्रतिष्ठाण लोहारा) तर्फे बक्षीस देण्यात येणार आहे.स्पर्धा हायस्कूल लोहारा शाळेच्या आवारात दि.15 रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे.तरी स्पर्धेत सहभागी होऊ इच्छानाऱ्यानी विकास घोडके (8329237963) या मोबाईल/व्हाट्सएप नंबर वर संपर्क साधून किंवा मेसेज करून नाव नोंदणी करावी असे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.