तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याचा वाद पेटला, पुजाऱ्यांसह वापऱ्यांना व शहर वासियांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप, तुळजापूर बंदला शंभर टक्के प्रतिसाद
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याचा वाद पेटला,
पुजाऱ्यांसह वापऱ्यांना व शहर वासियांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप, तुळजापूर बंदला शंभर टक्के प्रतिसाद
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यातील दर्शन मंडप मंदिर महाद्वार शेजारीच झाला पाहिजेल या मागणीसाठी पुजारी, व्यापारी आणि नागरिकांनी बुधवार दिनांक 11 आक्टोबर रोजी तुळजापूर बंदचे आव्हान केले होते त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळून व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे शहरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली. सकाळपासूनच सर्व दुकाने बंद असल्यामुळे भाविक भक्तांना पाणी देखील मिळू शकले नाही. उन्हाचा पारा चांगला चढला होता आणि बाजारपेठ बंद असल्यामुळे पाण्यावाचून लहान मुले वृद्ध भाविक भक्तांचे हाल झाले. या बंदमध्ये पुजारी वर्ग असल्यामुळे भाविक भक्तांच्या पूजा कुलधर्म कुलाचार विधी देखील होऊ शकल्या नाहीत केवळ दर्शन घेऊन भाविक निराश होऊन परत जात होते. प्रशासनास सद्बुद्धी मिळो आणि भाविक भक्तांची तसेच व्यापारी आणि पुजाऱ्यांची हेळसांड होऊ नये म्हणून दर्शन मंडप मंदिर महाद्वार शेजारी करावा यासाठी तुळजाभवानी मातेस महाआरती करण्यात आली. यावेळी शहरातील पुजारी व्यापारी आणि शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर युवकांनी मोटरसायकल रॅली काढली होती या रॅलीतून दर्शन मंडप मंदिराजवळ झाला पाहिजे अशा घोषणा देत हे युवक शहरात फिरत होते. एकंदरीत भाविक भक्तांची आणि पुजाऱ्यांची हेळसांड टाळण्यासाठी दर्शन मंडप हा महाद्वार शेजारीच झाला पाहिजेल या मागणीसाठी तिन्ही पुजारी मंडळ व्यापारी आणि शहरवासीय एकजुटी झाल्याचे चित्र आज या बंदच्या माध्यमातून दिसून आले…
आई तुळजाभवानी मंदिर व परिसराचा विकास करण्याचा महत्वकांशी प्रकल्प हाती घेतला आहे. या आराखड्यास राज्य मंत्रीमंडळाने 1328 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. पुजारी, व्यापारी, भाविक, व स्थानिक नागरिक यांना विश्वासात घेऊनच अंतिम आराखडा केला जाणार आहे. याबाबत कोणतेही शंका घेण्याचं कारण नाही. मात्र, काही लोक स्वार्थापोटी याला विरोध करत आहे. ते चुकीचं आहे.
श्री राणाजगजीतसिंह पाटील, आमदार तथा विश्वस्त तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर.
यापूर्वीही स्व.विलासराव देशमुख यांनी तुळजापूर विकास प्राधिकरणासाठी साडेतीनशे कोटी निधी दिला त्यावेळीही स्थानिक नागरिक पुजारी व्यापारी यांचे नुकसान होणार नाही याचा विचार करून आराखडा तयार केला होता.
परतु हे शासन जनतेच्या मागण्या सोयीस्करपणे टाळून काम करत आहे.जे की जनतेच्या हिताची नाही मागण्या मान्य न झाल्यास या विरोधात मी ही तीव्र आंदोलन करणार आहे.
मधुकरराव चव्हाण,मा.आमदार तुळजापूर तथा माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य
तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलो होतो. बाहेरुनच दर्शन घेतले. पाणी सुद्धा पिण्यास मिळाले नाही.
देविदास शिंदे – भाविक पंढरपूर
.