तुळजापूर येथे रेणुका माता मल्टी स्टेट अर्बन बँकेच्या शाखेचे योगेश केदार यांच्या हस्ते उद्घाटन.
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूर येथे रेणुका माता मल्टी स्टेट अर्बन बँकेच्या शाखेचे योगेश केदार यांच्या हस्ते उद्घाटन.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
देशभर 11 राज्यात शाखांचे जाळे निर्माण केलेली ही क्रेडिट बँक आहे. जवळपास सत्तर हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त एकूण व्यवसाय आहे. आज तुळजापूर शहरात बोरगावकर कॉम्प्लेक्स मध्ये या संस्थेच्या शाखेचे उद्घाटन झाले. येणाऱ्या काळात तुळजापूर शहर व तालुक्यातील छोट्या व्यावसायिकांना व तसेच शेतकऱ्यांना सुलभ पत पुरवठा करण्याची योजना सदर बँकेची आहे.
“तुळजापूर ला रेल्वे मंजूर करून आणण्यात भूमिका निभावली, धाराशिव ला पासपोर्ट कार्यालय आणले, गॅस पाइप लाइन योजना आणली. आणखीही अनेक सरकारी योजना आणल्या. फक्त मार्केटिंग ला कमी पडलो. आता आमचे मित्र असलेले भालेराव साहेबांना विनंती करून त्यांच्या बँकेची शाखा आणली. ती देखील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या फाईल वगेरे करून घेण्यासाठी. इतरही सामाजच्या योजना असतील त्या आपल्या तालुक्यातील बांधवांना सुरळीत पतपुरवठा व्हावा हा उद्देश.
रेणुका माता मल्टी चे वरिष्ठ अडमिन कार्तिक जी, मॅनेजर महेश केदार बँक पी ओ नितीन पवार व राजू जाधव उपस्थित होते.