ब्रेकिंगमहाराष्ट्र
श्रीतुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त15, 23 आणि 28 ऑक्टोंबर रोजी तुळजापूर शहरात दारुबंदी

श्रीतुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त15, 23 आणि 28 ऑक्टोंबर रोजी तुळजापूर शहरात दारुबंदी
धाराशिव/न्यूज सिक्सर
तुळजापूर येथे 15 ते 30 ऑक्टोंबर या कालावघीत श्री.तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव संपन्न होणार आहे. या कालावधीत तुळजापूर शहरातील सार्वजनिक शांतता अबाधित राहून कायदा व सुव्यवस्थेत नवरात्रोत्सव साजरा होण्यासाठी 15 ऑक्टोंबर रोजी घटस्थापना, 23 ऑक्टोंबर रोजी होमावर धार्मिक विधी आणि 28 ऑक्टोंबर रोजी कोजागिरी पौर्णिमा या दिवशी तुळजापूर शहरातील (स्थानिक)(नगर परिषद हद्दीतील) सर्व प्रकारच्या मद्यविक्री, अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 142(1) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.