
लोहारा -प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडीवडगाव येथील इयत्ता पाचवी मध्ये शिकणारा समर्थ संजय पळसे याची नवोदय विद्यालय तुळजापूर मध्ये निवड झाल्या निमित्त शाळेच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी वडगांव केंद्राचे केंद्र प्रमुख गायकवाड जीवनराव शाळा व समितीचे अध्यक्षा उज्वला बचाटे,उपाध्यक्ष दिलीप लकडे गावचे माजी व उप सरपंच अंकुश भुजबळ,पोषण आहार कर्मचारी रेड्डी आप्पा व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.