
लोहारा -प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील जेवळी (उ) ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेला बुधवारी (दि.३०) पहाटे मंदिरातील शिवलिंगाची रुद्रभिषेक व पंचकलश पूजेनी सुरवात झाली. सकाळी दहा वाजता सालाबाद प्रमाणे परिसरातील अनेक पशुधन व बैलजोड्यांची गावाततून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून उत्कृष्ट पशूंना पारितोषिके देण्यात आली. बैलजोड्यांची मिरवणुक हे यात्रेच्या पहिल्या दिवशीचे आकर्षण असते.
जेवळी येथे महात्मा बसवेश्वरांच पुरातन मंदिर असून येथे जयंती यात्रेच्या स्वरूपात साजरी केली जाते. तीन दिवास चालणाऱ्या या यात्रा मोहत्सवाची सुरूवात बुधवारी (दि.३०) पाहाटे पाचच्या सुमारास मंदिरातील शिवलींगाची पंचकलश पुजा, रुद्राअभिशकाने झाली. सकाळी आठ वाजता येथील काशिनाथ स्वामी यांच्या घरी बसवेश्वरांच्या पाळण्याचा कार्यक्रम पार पडला. दहा वाजता परिसरातील पशु पालकानी आणलेल्या पशुधन व बैलजोड्यांची गावातील मुख्यरस्त्यावरुन सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी या पशुंना बैलपोळा प्रमाणे मोठ्या प्रमाणात सजविण्या आले होते. ही मिरवणूक मंदिर परिसरात गेल्या नंतर जिल्हा स्तरीय पशु प्रदर्शन पार पडले. यावेळी उत्कृष्ट पशुंच्या पालकाना गट निहाय पारितोषिके देण्यात आले आहे. ही पारितोषिके या परिसरातील शेतकरी वर्गात मानाचे समजले जातात. कांही पशुपालक तर यात्रेत पारितोषिके मिळावी म्हणून पशुधन साभांळत असतात.
उत्कृष्ट पशुपालकांचे गटनिहाय नावे अशी – खिल्लार बैल जोडीः प्रथम- अंकुश माळी, द्वितीय- सूर्यकांत पणुरे, खिल्लार खोंड जोडीः प्रथम- संजय राजपूत, द्वितीय – भास्कर गायकवाड, खिलार खोंड (सिंगल): प्रथम- सत्येश्वर कारभारी, द्वितीय पिंटू पंचभाई, जवारी बैल जोडी: प्रथम सिताराम, जाधव, द्वितीय ताराचंद राठोड, जवारी खोंड जोडी: प्रथम- गुणवंत कारभारी, द्वितीय- शब्बीर पठाण, देवणी बैल जोडी: प्रथम- आप्पाशा गोवे, द्वितीय- रणवीर पाटील, देवणी खोंड जोडी: प्रथम- महादेव मोघे, द्वितीय- निलाप्पा राठोड, देवणी खोंड (सिंगल): प्रथम- सुभाष आडे, द्वितीय- ज्ञानेश्वर साळुंखे, जरशी (संकरित) बैल जोडी: प्रथम मल्लिनाथ कोराळे, द्वितीय- काशिनाथ चवले, जरशी खोंड जोडी: प्रथम- सचिन कारभारी, द्वितीय- अरविंद माळी, जवारी गाय: प्रथम- वैजनाथ, द्वितीय मडोळे, प्रभू तोरे, देवणी गाय: प्रथम- वैजनाथ हावळे, द्वितीय- विजय ढोबळे, जरशी गाय: प्रथम- बालाजी जांभळे, द्वितीय- मोहन पणुरे, कंदारी गाय: प्रथम- बाबू जाधव, द्वितीय बाळासाहेब कुलकर्णी, खिलार गाय: प्रथम- महादेव होनाजे, द्वितीय- दिलीप भैरप्पा, खिलार कारवड: प्रथम- सिद्धू गवारे, द्वितीय- शिवा नकाशे, जरशी कारवड: प्रथम- रमेश हावळे, द्वितीय- राहुल हावळे, घोडा प्रथम बाबा घोडेवाले. यावेळी उत्कृष्ट पशु निवढीसाठी निरीक्षक म्हणून विलास कारभारी, नागनाथ चवले, सचिन कारभारी, बाबुराव माळी, सुधाकर माळी, अनिल शिंगाडे, शिवा होनाजी, राजेंद्र गाडेकर आदींनी काम पाहीले. या पारितोषिक प्राप्त पशुंचे पशुपालकाकडून मंदिरापासुन आपल्या घरापर्यंत हलक्याच्या कडकडाट, गुलालाची उदळन करीत मिरवणूक काढण्यात आली