न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

परंडा भुईकोट किल्ला खंदकालगतचे अतिक्रमण काढण्यात यावे-भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर

Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
परंडा भुईकोट किल्ला खंदकालगतचे अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी निवेदनाद्वारे धाराशिव जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे कि, जा.क्र./न प पं / बाध वि/2025 दि.25/4/2025 रोजीची परंडा न.प. ची नोटीस. पुरातत्व विभाग व आपल्या आदेशान्वये परंडा येथील भुईकोट किल्ल्याच्या खंदकालगतचे अतिक्रमण दि.4/5/2025 पर्यंत काढुन घेण्याच्या सुचना परंडा नगरपालिकेने उपरोक्त संदर्भीय पत्राद्वारे 149 मालमत्ता धारकांना देण्यात आल्या आहेत. परंडा येथील भुईकोट किल्ल्याच्या खंदकालगतचे बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यास कांहीच हरकत नाही. मात्र बहुतांश मालमत्ता धारकांनी अनेक दशंकापुर्वी जागेची रितसर खरेदी घेऊन नगर पालिकेची नोंद असुन त्यांनी रितसर बांधकाम परवाना घेऊन निवासी व व्यवसायिक बांधकाम केलेले आहे. तसेच सदर मालमत्तेचा कराचा भरणा देखील नगरपालिकेकडे करतात. तसेच परंडा येथील भुईकोट किल्ल्याच्या लगतच परंडा नगर पालिकेने अनेक वर्षीपुर्वी व्यापारी संकुल बांधलेले आहे. नगरपषदेकडुन सरसकट मालमत्ता धारकांना अतिक्रमण म्हणुन ते हटविण्याची नोटीस दिल्याने अनेकांचे संसार उघड्यावर येणार आहेत. तर अनेक उदरनिर्वाहाचे साधन बंद पडणार आहे. तरी सदरहु अतिक्रमण काढताना मालमत्तेचा नगर पालिकेत असलेल्या नोंदी व सबंधीत मालमत्ता धारकांचे दस्तऐवज तपासुनच पुढील कार्यवाही करणे योग्य राहिल. तरी परंडा येथील भुईकोट किल्ल्याच्या खंदकालगतचे अतिक्रमण काढताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे