श्री जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त जब्बार मुल्ला यांच्या वतीने ऊसाचा रस वाटप
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री जगत ज्योती महात्मा बसवेश्वर मराज यांच्या जयंतीनिमित्त जब्बार मुल्ला यांच्या वतीने सामाजिक भावना जपत ऊसाचा रस वाटप करण्यात आला. यावेळी श्री जगत ज्योती महात्मा बसवेश्वर मराज यांच्या प्रतिमेचे पुजन तहसीलदार रणजितसिंह कोळेकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या हस्ते करुण अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच नागण्णा वकील, नगरपंचायत माजी गटनेते अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शब्बीर गवंडी, मंडळ अधिकारी जगदीश लांडगे, ठाकरे गट शिवसेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, माजी उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, नगरसेवक अविनाश माळी, पं.स. माजी सदस्य दिपक रोडगे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरी लोखंडे, नगरसेवक प्रशांत काळे, नगरसेवक विजयकुमार ढगे, के.डी.पाटील, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, माजी सरपंच निर्मला स्वामी, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, मिलाप मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दादा भाई मुल्ला, प्राचार्य शहाजी जाधव, इस्माईल मुल्ला, कृषी सहाय्यक शैलेश जट्टे, पोलीस कर्मचारी माधव कोळी, हेमंत माळवदकर, ज्येष्ठ पत्रकार बालाजी बिराजदार, गिरीश भगत, आब्बास शेख, राजकुमार जट्टे, वैजिनाथ जट्टे, धोंडप्पा लोखंडे, शिवानंद माशाळकर, शिवमुर्ती मुळे, मुन्ना स्वामी, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.