न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

जेवळी येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वर यात्रेला आज पासून सुरुवात..

Post-गणेश खबोले

 

लोहारा-प्रतिनिधि

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील ग्रामदैवत माहात्मा बसवेश्वरांच्या यात्रेला रविवार (दि.२७) रोजी सुरुवात झाली.दि.२९ पर्यंत कालावधीत सालाबादप्रमाणे राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेचे आयोजीत करण्यात आले आहे. या तीन दिवशीय राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेसाठी यात्रा समितीच्या वतीने विजेत्यांसाठी एकूण दोन लाख रुपयाचे रोख पारितोषिक व चषक ठेवण्यात आले आहे.

ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या जयंती निमित्त येथे अक्षयतृतीयापासुन तीन दिवस मोठी यात्रा भरते. या यात्रेनिमित्त येथे विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केली जातात. यावर्षी ही बुधवार (दि.३० एप्रिल) ते शुक्रवार (दि.२ मे) या कालावधीत पार पडत आहे. यात गेल्या आठरा वर्षापासून यात्रा समितीच्या वतीने राजस्तरीय नृत्य स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेसाठी राजभरातून स्पर्धक सहभागी होतात. या वर्षी रविवार (दि.२७) पासुन या स्पर्धेला सुरुवात होत असून या दिवशी सोळा वर्षी खालील (बालगट) वैयक्तिक व समूह नृत्य स्पर्धा पार पडणार आहे. यात वैयक्तिक बालगट विजेत्यांना प्रथम पारितोषिक सात हजार रुपये, द्वितीय पाच हजार, तृतीय तीन हजार पाचशे रुपये व चषक देण्यात येणार आहे. याच दिवशी होणाऱ्या बाल समुह नृत्य स्पर्धासाठी विजेत्यांना प्रथम पारितोषिक आकरा हजार, द्वितीय सात हजार, तर तृतीय पाच हजार रुपये देण्यात येणार आहे. सोमवारी (दि.२८) प्रौढ गटातील नृत्य स्पर्धा होईल. यात लावनी व वैयक्तिक नृत्य (स्त्री) स्पर्धे साठी प्रथम पारितोषिक पंधरा हजार रुपये, द्वितीय दहा हजार, तृतीय सात हजार रुपये ठेवण्यात आली आहे. याच दिवशी पुरुष लावणी व वैयक्तिक नृत्य स्पर्धा ही होईल यासाठी प्रथम पारितोषिक अकरा हजार, द्वितीय सात हजार, तृतीय पाच हजार रुपये ठेवण्यात आले आहे. मंगळवारी (दि.२९) प्रौढ गटातील युगल नृत्य व समुह नृत्य स्पर्धा होईल. युगल नृत्यासाठी प्रथम पारितोषिक दहा हजार, द्वितीय सात हजार, तृतीय पाच हजार रुपये ठेवण्यात आले आहे. याच दिवशी होणाऱ्या प्रौढ गटातील समुह नृत्यस्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक हे तेत्तीस हजार, द्वितीय पंचवीस हजार, तृतीय एकवीस हजार रुपये व चषक ठेवण्यात आले आहे. अशी माहिती यात्रा समितीच्या वतिने देण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे