साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे होळी येथे अनावरण
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील होळी येथे दि.१ मे रोजी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून सुखदेव होळीकर बहुउद्देशीय व शैक्षणिक संस्था संचलित सत्यशोधक डॉ.अण्णाभाऊ साठे इंग्लिश मेडियम स्कूल च्या वतीने डॉ.आण्णा भाऊ साठे यांचा धाराशिव जिल्ह्यातील पहिला अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवराज कोकाटे तर प्रमुख पाहुणे म्हणून लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश अध्यक्ष कैलास दादा खंदारे, प्रदेश सचिव दिलीप गायकवाड, शिवाजी गायकवाड, मराठवाडा उपाध्यक्ष राजाभाऊ शिंदे, सरपंच सरोजाताई बिराजदार, दत्ताभाऊ गायकवाड, संजय बिराजदार,प्रदीप मोरे, संजय कांबळे, बालाजी गायकवाड अनिल सगट, विलास दादा मोमीन, सुधाकर बनसोडे,विजय तोरडकर,सारिकाताई कांबळे संजय सरवदे,आल्काताई कांबळे,भाग्यश्री सुर्यवंशी,बालाजी सरवदे,प्रताप होळीकर,कृष्णा सरवदे,भरत सरवदे,मारुती शिंदे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी राजर्षी शाहू महाविद्यालय लातुर येथील प्रयोग शाळा व्यवस्थापक परमेश्वर शिंदे यांना कर्मवीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. धाराशिव जिल्ह्यात डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा पहिला पुतळा बसविल्याबद्ल कार्यक्रमाचे संयोजक अँड. सुखदेव होळीकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना गायकवाड तर आभार प्रदर्शन केशव सरवदे यांनी केले.