
लोहारा- प्रतिनिधी
जि प कें प्रा शा लोहारा येथे आगामी सी बी एस सी अभ्यासक्रमाच्या पहिली वर्गात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व कॅप देऊन स्वागत करण्यात आले व इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यात आला .
तसेच शहरातील सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींनी शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, पत्रकार तथा शा व्य स सदस्य जसवंतसिंह बायस,(स्वयंपाकी कंत्राटदार) हुकूम इनामदार यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला .
यावेळी लोहारा तालुका शिक्षक सोसायटी संचालक पदी निवडून आल्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक दतात्रय फावडे, शिक्षक सुर्यकांत पांढरे व ज्योती पाटील यांचाही शाळा व्यवस्थापन समिती यांच्यातफे सत्कार करण्यात आला.अर्चना साखरे यांनी विनोबा ॲपमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश बनसोडे यांनी केले . जसवंतसिंह बायस यांनी आतापर्यंत शा व्य स ने केलेल्या कार्याची माहिती दिली.पहिलीत CBSE पॅटर्न अभ्यासक्रम असल्याने पालकांनी पहिलीत जि प शाळेतच प्रवेश घेण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा सौ वैशाली ताई खराडे, उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर ,नगरसेवक प्रशांत काळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरि लोखंडे,उपाध्यक्ष अमिर हमजा खुटेपड,सदस्य जसवंतसिंह बायस,व्यंकटेश पोतदार,तात्या कांबळे,सौ ज्योती स्वामी,सौ.अश्विनी अपसिंगेकर,श्री चंदनशिवे व्ही एस (केंद्र प्रमुख लोहारा) ,साधन व्यक्ती काळे सर व आगळे सर, हैदर चाचा तसेच पहिलीच्या विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षणप्रेमी नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते .
इयत्ता पहिलीत ४० विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी प्रवेश घेतला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुर्यकांत पांढरे यांनी केले .या कार्यक्रमासाठी शाळेतील मु अ व सर्व शिक्षकांनी पुढाकार घेतला .