ग्रामीण भागातील २८ विद्यार्थिनींला सायकल वाटप,जेम्स मुंबई,या सामाजिक संस्थेचा उपक्रम
Post-गणेश खबोले

लोहारा (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी शिक्षणाची ग्वाही देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम लोहारा तालुक्यात राबवण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या २८ विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. “जेम्स मुंबई”, या सामाजिक संस्थेने गरजू मुलींची तालुक्यातून निवड केली व हा कार्यक्रम गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पार पडला.
विद्यार्थिनींसाठी सायकल वाटपाचे अनेक फायदे होणार आहेत.वेळेची बचत दूरवरून शाळेत पायी येणाऱ्या विद्यार्थिनींचा प्रवास वेळखाऊ होता. सायकलमुळे त्यांना शाळेत वेळेत पोहोचता येणार आहे.शारीरिक श्रमात बचाव होऊन चालत येताना लागणाऱ्या श्रमांपासून वाचल्यामुळे त्यांची एकाग्रता आणि अभ्यासात लक्ष केंद्रित होण्यास मदत होईल.ग्रामीण भागात मुलींना चालत येताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे. सायकलमुळे त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल.शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होईल व ये-जा करण्यातील अडथळ्यांमुळे काही मुली शाळा सोडत असत. सायकलमुळे त्यांचे शिक्षण सुरू राहण्यास प्रोत्साहन मिळेल. सायकलमुळे मुलींमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढेल.हा उपक्रम केवळ एकदाच न राहता, गरजू विद्यार्थिनींसाठी नियमित राबवला जाईल. ग्रामीण भागातील प्रत्येक मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी शिक्षण विभाग कटिबद्ध आहे. अशी ग्वाही गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी दिली
शिक्षण हा प्रत्येक मुलीचा हक्क असून, कोणत्याही अडचणीमुळे तिचे शिक्षण अर्धवट राहू नये. सायकल वाटपामुळे शाळेतील उपस्थिती वाढेल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या आयुष्याला चालना मिळेल.असे मत प्रमुख पाहुणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांनी यावेळी व्यक्त केले
हा सायकल वाटप कार्यक्रम लोहारा येथील गटशिक्षण कार्यालयात संपन्न झाला. या प्रसंगी नगरसेवक प्रशांत काळे, विस्तार अधिकारी मुळजे,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष हरी लोखंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य महबूब गवंडी,अनिल मोरे,नितीन जाधव,विश्वजीत चंदनशिवे, सुधीर घोडके मल्लिकार्जुन कलशेट्टी, यांच्यासह अनेक पालक व विद्यार्थी उपस्थित होते.