
लोहारा -प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत दि.१६ रोजी लोहारा तहसील कार्यालयातील लोहारा पंचायत समिती सभागृहात पार पडली.यावेळी उपजिल्हाधिकारी (मांजरा प्रकल्प) उदयसिह भोसले, लोहारा तहसीलदार रणजितसिह कोळेकर यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली.यावेळी पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी जगदीश वगगे यांच्या सह तालुक्यातील विविध पक्ष प्रमुख, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोहारा तालुक्यातील अचलेर (सर्वसाधारण),आष्टा कासार(ना मा प्र महिला),बेलवाडी (सर्व साधारण महिला), बेंडकाळ(सर्व साधारण महिला),
भातागळी(सर्व साधारण महिला),भोसगा(सर्व साधारण महिला),चिंचोली रेबे(अनु.जाती महिला),दस्तापुर(सर्व साधारण),चिंचोली काटे (सर्व साधारण),धानुरी(ना मा प्र महिला),एकोंडी लोहारा (सर्व साधारण महिला), हरळी(अनु जाती महिला),हिप्परगा सय्यद(ना मा प्र),हिप्परगा रवा(ना मा प्र महिला), होळी(सर्व साधारण), जेवळी(उ)(अनु. जाती),जेवळी(द)(अनु.जाती),कानेगाव(ना मा प्र महिला),करजगाव(सर्व साधारण),करवंजी(सर्व साधारण),कास्ती(बु)(ना मा प्र),कास्ती(खु)(सर्व साधारण महिला),खेड(सर्व साधारण), कोंडजीगड(सर्व साधारण महिला),लोहारा(खु)(ना ब
मा प्र महिला),माकणी(सर्व साधारण),माळेगाव(ना मा प्र), मार्डी(सर्व साधारण महिला), मोघा(बु)(सर्व साधारण महिला),मुर्षदपूर(ना मा प्र), नागराळ(सर्व साधारण महिला),नागुर(ना मा प्र),फनेपुर(अनु जाती), राजेगाव(सर्व साधारण),सालेगाव(सर्व साधारण),सास्तुर((सर्व साधारण),तावशीगड(सर्व साधारण महिला),तोरंबा(ना मा प्र महिला), उदतपूर(सर्व साधारण महिला),विलासपुर पांढरी(अनु जाती महिला),उंडरगाव(सर्व साधारण महिला),वडगांव(गा)(ना मा प्र),वाडी(वडगांव)(अनु जाती)
याप्रमाणे आरक्षण जाहीर झाले. पंचायत समिती सभागृहात लहान मुलांच्या हाताने चिट्टी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील, हे अजून निश्चित नसले, तरी प्रशासनाने त्यांच्या पातळीवर तयारी सुरू केली आहे.त्यानुसार ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे.