
लोहारा (प्रतिनिधी)
लोहारा तालुका शिक्षक व सेवकांची पतसंस्था मर्यादित, लोहारा या संस्थेच्या निवडणुकीत नुकतेच संचालक म्हणून निवडून आलेल्या शिक्षकांचा सत्कार समारंभ लोहारा येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उमरगा-लोहारा तालुक्याचे आ प्रवीण स्वामी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्व संचालकांचा सन्मान करण्यात आला.
“शिक्षक वर्ग हा समाजाचा कणा असून, त्यांच्याकडून शैक्षणिक जबाबदाऱ्या पार पाडताना आर्थिक व सहकारी क्षेत्रातही पारदर्शक व निष्ठेने काम होणे आवश्यक आहे. पतसंस्था ही शिक्षकांची सामूहिक ताकद आहे, आणि नवीन संचालक मंडळाने आदर्श निर्माण करत एकात्मतेने संस्था सक्षम करावी, तसेच पतसंस्थेच्या विकासासाठी सर्व संचालकांनी एकत्रितपणे निर्णय घ्यावेत. सभासदांच्या हितासाठी पारदर्शकता ठेवत नव्या योजना राबवाव्यात. यामार्फत संस्था आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल,असे आवाहन आमदार प्रवीण स्वामी यांनी केले.
श्रीमती ज्योती पाटील, सोनाली जगताप, सुदर्शन जावळे, गजानन मक्तेदार, राम मुसाडे, सुधीर घोडके, सूर्यकांत पांढरे, प्रवीण शिंदे, विकास घोडके, बाळासाहेब कदम, दत्ता फावडे, मल्लिकार्जुन कलशेट्टी, बळीराम आलमले, श्रीशैल्य जट्टे, जीवन गायकवाड.आदी संचालकाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी चंद्रकांत कदम,बळीराम आलमले,व्यंकट पोतदार,सूर्यकांत पांढरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला युवा नेते अजिंक्य पाटील,शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शहर प्रमुख सलीम शेख,रौफ बागवान, माजी ग्रामपंचायत सदस्य महबूब गवंडी, शिवा स्वामी,विभाग प्रमुख आप्पाराव गायकवाड,विलास जेवळीकर,नितीन जाधव,तुकाराम पाटील,ओम पाटील,विलास राजू स्वामी यासह शिक्षक, सभासद व मान्यवर उपस्थित होते.