भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लोहारा शहरात रस वाटप
Post-गणेश खबोले

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोहारा शहरात जब्बार मुल्ला यांच्या वतीने सामाजिक भावना जपत रस वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन नगरसेवक अविनाश माळी यांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा वैशालीताई खराडे, उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, माजी गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक गौस मोमिन, नगरसेवक जालिंदर कोकणे, नगरसेवक विजयकुमार ढगे, ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कांबळे, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, माजी नगरसेवक शाम नारायणकर, आरपीआय आठवले गट तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे, बाबा शेख, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, दादाभाई मुल्ला, आदम मुल्ला, महादेव कांबळे, तुळशीराम कांबळे, सुनिल कांबळे, प्रितम शिंदे, बाळु शिंदे, मिलिंद नांगवंशी, प्राचार्य शहाजी जाधव, पुरुषोत्तम सितापुरे, लक्ष्मण रोडगे, दत्ता रोडगे, यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.