न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

गावठी पिस्टल सह जिवंत राऊंड,कोयते,सुरी असे घातक शस्त्र व वाहनासह ०१ आरोपीस जेलबंद उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा यांची दमदार कामगिरी

Post-गणेश खबोले

 

उमरगा-प्रतिनिधी

उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग उमरगा सदाशिव शेलार यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा समोरील बाजुस असलेल्या ड्रिम हाऊस कॅफे मध्ये कार क्र. MH-25-AB-6279 यामध्ये आलेल्या एक काळा शर्ट घातलेल्या इसमाने त्याचे कमरेमध्ये एक पिस्टल बाळगलेला आहे व तो कॅफेच्या वरच्या मजल्यावर बसलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा सदाशिव शेलार, यांनी पो.नि. अश्विनी भोसले, पोउपनि अनुसया माने, पोहेकों/ 1258 बोयणे, पोहेकों/1183 सोनवणे, पोना / 1517 अवचार, पोकों/1073 थोरे, पोकों/782 कांबळे, पोकों/364 जाधव यांना छापा बाबत मार्गदर्शन करून व आदेश देवुन कारवाई करिता पाठविले वरील अधिकारी व अंमलदार यांनी छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा समोरील बाजूस असलेल्या ड्रिम हाऊस कॅफे मध्ये पंचासह गेले असता कॅफेच्या वरच्या मजल्यावरून एक काळा शर्ट घातलेला इसम हा खाली उतरून कॅफे समोर लावलेल्या कार क्र. MH-25-AB-6279 जवळ गेले असता त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव गांव विचारले असता त्यांने त्याचे नांव सुशील संतोष शहापुरे रा.तुरोरी ता.उमरगा जि. धाराशिव असे सांगीतले असता त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक 25,000 रू. किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व 04 जिवंत राऊंड मिळुन आले. तसेच त्याचे ताब्यातील कार क्र. MH-25-AB-6279 ची झडती घेतली असता सदर कारचे पाठीमागील डिक्की मध्ये 3500 रू. किमतीचे 6 कोयते व 1 सुरा असे अवैध हत्यार विना पासपरवाना बाळगल्याचे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून देशी बनावटीचे 1 पिस्टल,4 जिवंत राऊंड,6 कोयते,1 सुरा व वापरलेली कार क्र. MH-25-AB-6279 एकुण 2,53,500 रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरूध्द पो.स्टे. उमरगा येथे गु.र.नं. 222/2025 कलम 3/25, 4/25 शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला असुन पुढील तपास सपोनि.पांडुरंग कन्हेरे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक धाराशिव संजय जाधव,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा सदाशिव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.अश्विनी भोसले, पोउपनि अनुसया माने,पोहेकॉ/1258 संतोष बोयणे, पोहेकों/ 1183 संतोष सोनवणे, पोना / 1517 महेश अवचार, पोकों/1073 शिवराज थोरे, पोकों/782 आनंद कांबळे, पोकों/364 बालाजी जाधव यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे