ब्रेकिंग
“श्रीराम कथा” कार्यक्रमास भाजपा पुणे छावणीचे आ.सुनील भाऊ कांबळे, भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूरउपस्थित
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
परंडा येथे श्री हनुमान रथोत्सव निमित्त सकल हिंदू समाज आयोजित सुरू असलेल्या ह.भ.प.रामायणाचार्य श्री. विश्वंभर महाराज माळोदे यांच्या “श्रीराम कथा” कार्यक्रमास भाजपाचे पुणे छावणीचे आमदार सुनीलभाऊ कांबळे, भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर, शिवसेना नेते जिल्हा परिषदचे माजी सभापती दत्ताअण्णा साळुंके, शिवसेना उबाठाचे जिल्हा प्रमुख रणजीत पाटील, अदिंनी उपस्थित राहुन दर्शन घेतले. गेल्या कांही वर्षांपासून येथील युवकांच्या पुढाकारातून श्री रामनवमी व हनुमान जयंतीच्या औचित्याने प्रतीवर्षी अशा धार्मिक कथा/कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात भक्तांची विशेषतः महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती.