
लोहारा/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस व 1.5 कोटी सदस्य ध्येयपूर्ती झाल्याबद्दल दि.6 एप्रिल रोजी ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर संमेलनास महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. या अनुशंगाने लोहारा शहरातील न्यु व्हिजन इंग्लिश स्कूल मध्ये लोहारा तालुका भाजपाच्या वतीने भाजपा स्थापना दिवस निमित्त कार्यकर्ता संमेलन घेण्यात आला. यावेळी प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख म्हणुन खंडेराव चौरे (प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा संघटन पर्व निवडणूक प्रभारी लोहारा तालुका), राहुल दादा पाटील (विधानसभा प्रमुख, उमरगा-लोहारा), भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, मारुती मुंडे दिव्यांग आघाडी मराठवाडा संयोजक, अदि उपस्थित होते. यावेळी खंडेराव चौरे, राहुल (दादा) पाटील यांनी भाजपा स्थापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, तालुका उपाध्यक्ष दिलीप पवार, तालुका उपाध्यक्ष दत्ता कडबाने, युवा मोर्चा शहराध्यक्ष बाबा सुंबेकर, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, तालुका चिटणीस युवराज जाधव, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष मल्लीनाथ फावडे, अॅड. रवि भोंडवे, युवा मोर्चा सरचिटणीस सुयेश दंडगुले, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, प्रशिध्दीप्रमुख निकेश बचाटे, पं.स.माजी सदस्य ज्ञानेश्वर परसे, माजी सरपंच विजयकुमार क्षीरसागर, प्राचार्य शहाजी जाधव, काशिनाथ घोडके, अशोक तिगाडे, दादा काळप्पा, आनंदराव हासुरे, संतोष मुर्दे, परमेस्वर कदम, आकाश आष्टे, यांच्यासह बुथ प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोद पोतदार यांनी केले तर आभार तालुका उपाध्यक्ष संपत देवकर यांनी मानले.