
लोहारा/प्रतिनिधी
“राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” हा विचार घेऊन भारतीय जनता पार्टी ची स्थापना झाली. भाजपा स्थापना दिवसानिमित्त भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी भारतमातेचे पुजन करून ध्वजारोहण केले. तसेच भाजपा स्थापना दिवसानिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनात राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससाहेब यांनी मार्गदर्शन केले. या कार्यकर्ता संमेलनात तालुक्यातील “जेष्ठ कार्यकर्ता” म्हणून माजी आ.सुजितसिंह ठाकूर, राजेंद्र चौधरी, अब्दुल शेख, विठ्ठल तिपाले, संदीप शहा, दादासाहेब गुडे, बापुसाहेब देशमाने, अर्जुनबापु शिंदे, अशोक भांडवलकर यांचा सन्मान तालुक्याच्या वतीने करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.गणेश खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, न.प. परंडा माजी गटनेते सुबोधसिंह ठाकूर, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.झहीर चौधरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा नेते गोपालसिंह ठाकूर, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, जिल्हा चिटणीस सुजित परदेशी, जिल्हा युवा मोर्चा चिटणीस रामकृष्ण घोडके, ता.उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, ता.सरचिटणीस तानाजी पाटील, धनाजी गायकवाड, वैद्यकीय आघाडीचे डॉ.आनंद मोरे, डॉ. अमोल गोफणे, मुकुंद चोबे, अजित काकडे, रामदास गुडे, जयंत सायकर, मनोहर पवार, गजानन तिवारी, मिलिंद शिंदे, अमर ठाकूर, किरण पांडे, व्यंकटेश दिक्षित, आप्पा मदने, आदर्श ठाकूर, बाळासाहेब गिरी, श्रीकृष्ण शिंदे, किरण कवटे, सुभाष लटके, बबन चौधरी, साहेबराव पाडुळे, शिवाजीराव पाटील, अर्जुन कोलते, सागर पाटील, योगेश डांगे, हिमालय वाघमारे, महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ.ज्योती भातलवंडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.