जेवळी येथे विरक्त मठ लोकार्पण आणि मंदिर कळसारोहण निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील जेवळी येथे श्री गुरूसिध्देश्वर विरक्तमठ लोकार्पण आणि श्री विरभद्रेश्वर मंदिर कळसारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दि.३१ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान शिवकथाकर हरीहरानंद भारती स्वामीजी धरूर यांच्या सानिध्यात शिवकथा दि.३ एप्रिल ते ५ एप्रिल दरम्यान अतिरुद्र याग, चंडिका होम,सर्व देवता आराधना,दि.५ एप्रिल रोजी शिवदीक्षा व अय्याचार, दि.६ रोजी शिवकथा समाप्ती निमित्त काशीपीठ जगद्गुरु यांच्या सानिध्यात दिव्य सानिध्य तर दि.७ रोजी जगद्गुरू श्री.श्री.श्री.१००८ डॉ.प्रसन्ना रेणूकावीर,सोमेश्वर शिवाचार्य भगवत पाद महास्वामीजी श्रीमद रंभापुरी’ महापीठ’ चिक्कमंगरूळ कर्नाटक यांच्या अमृतहस्ते कळसारोहण व सुहासिनी पुजन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जेवळी ता.लोहारा येथे जवळपास दिड कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठाचे वास्तु पूजन, लोकार्पण व श्री विरभद्रेश्वर मंदिर कळसारोहण कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी येथे एक आठवडाभर विविध कार्यक्रमांचे रेलचेल असून यावेळी दोन जगद्गुरुसह जवळपास पन्नास मठाधिपती, साधु- संत- महत व हजारो भाविक – भक्तांची उपस्थितीत राहणार आहे.
जेवळी ता.लोहारा येथील श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठाचे मठाधीश म्हणून ३ नोव्हेंबर २००६ ला मनिप्र श्री गंगाधर महास्वामीजी यांचा पट्टाधिका सोहळा पार पडला. मठाधीश संस्कृत व वैदिक अभ्यासात विशेष प्राविण्य संपादन केले असून धार्मिक शिक्षणाबरोबरच ज्योतिषी विद्या विशारद ही पदवी प्राप्त केली आहे. दरम्यान भूकंपात जेवळी येथे मोठ्या प्रमाणात हानी झाले होती. यात बेन्नीतुरा नदीकाठी असलेल्या श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठाचे ही नुकसान झाले होते. जेवळी गावच्या पुनर्वस्नानंतर येथील परिसरातील भावी भक्तांनी एकत्र येत जवळपास दीड कोटी रुपये लोक वाटा गोळा करून आधुनिक पद्धतीने मठाची निर्मिती केली आहे. आता सोमवारी दि.७ रंभापुरी महापिठाचे जगद्गुरु डॉ. प्रसन्ना रेणुकावीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी व काशी महापिठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील नव्याने बांधण्यात आलेल्या श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठाचे वास्तु पूजन, लोकार्पण व श्री विरभद्रेश्वर मंदिर कळसारोहण कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान यासाठी येथे एक आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. ३१ मार्च ते ६ एप्रिल या काळात दररोज दुपारी तीन ते सायंकाळी पाच पर्यंत शिव कथाकार हरीहरानंद भारती स्वामीजी (धारुर) यांचा शिवकथा कार्यक्रम पार पडणार आहे. ३ ते ५ एप्रिल या तीन दिवस सकाळी आठ वाजता अतिरुद्र याग, चंडिका होम व सर्व देवता आराधना, ५ एप्रिल ला आठ वाजता शिवलिंग दीक्षा व आय्याचार तर ७ एप्रिल सोमवारी अकरा वाजता मठाचे वास्तु पूजन, लोकार्पण व श्री विरभद्रेश्वर मंदिर कळसारोहण पार पडणार आहे. यावेळी परिसरातील पाच हजार सुवासिनींचे पुजन व ओटी भरण कार्यक्रम, यानंतर जगद्गुरु व ठीक ठिकाणाहून आलेले मठाधीश, साधुसंत, महंत यांच्या उपस्थितीत धर्मसभा पार पडणार आहे. यावेळी हजारो भाविक भक्त, शिष्य गण व नागरिक उपस्थितीत राहणार आहेत