
लोहारा प्रतिनिधी
उमरगा-लोहारा मतदारसंघातील रस्ते पाणी वीज या महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असुन या भागातील प्रश्न सक्षमपणे विधानसभेत मांडण्यासाठी मला निवडून दिलात त्याबद्दल समस्या सोडविणे हे माझे आद्य कर्तव्य आहे ते पुर्ण करणार असल्याची ग्वाही आमदार प्रवीण स्वामी यांनी सय्यद हिप्परगा येथील कार्यक्रमात केली.
लोहारा तालुक्यातील सय्यद हिप्परगा येथे आमदार निधीतून सय्यद बाशा दर्गा रस्त्यासाठी पाच लाख रुपयांच्या सिमेंट रस्त्याचा साठी निधी देण्यात आला असून या कामाचे उद्घाटन पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार स्वामी म्हणाले की सध्या पाणी प्रश्न महत्त्वाचा आहे त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई बाबत गाव निहाय आढावा घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येईल अनेक गावात विजेचा समस्या भेडसावत असून सब स्टेशनची वाढती मागणी होत आहे त्यामुळे लोहारा खेड वडगाव या ठिकाणी सबस्टेशन साठी जागा महावितरण कडे हस्तांतरित करण्यात आली आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना लवकरच सबस्टेशन सुरू करून दिलासा मिळणार आहे वीज सबस्टेशन साठी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ सूचनाही देण्यात आले आहे माणूस हा चुकीचा पुतळा समजला जातो त्यामुळे चुका होत असल्यास अवश्य निदर्शनास आणून द्यावे यातून सुधारणा होऊ शकते जनतेना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे व त्या सोडविण्याचे साठी लोकप्रतिनिधीचे काम आहेत तुम्ही जे प्रश्न मांडत आहात ते माझ्या मनात आहेत थोडा वेळ लागेल मात्र सर्व प्रश्न मार्गी लावू या गावातील विकास कामासाठी पाच लाख रुपयाचा निधी दिला असला तरी आगामी काळात ही मोठा निधी देऊ १९९३ च्या भूकंपाच्या धक्क्यानंतर या भागातील अनेक प्रश्न अजूनही कायम आहेत त्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करून हे प्रश्न सोडवण्याचा कसोशीने प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी उपसरपंच गुरुनाथ यादव,लोहारा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष शाम सुंदर तोरकडी,श्रीशैल ओवांडे,धोंडीबा ओवांडे, तंटामुक्त अध्यक्ष संतराम भोजराव, संतोष यादव, नागनाथ पाटील, पांडुरंग वाकडे, संजीव पाटील, सोमनाथ बोडवे, अण्णाप्पा बिराजदार, महादेव कोटमाळे, बालाजी गवारे,वैभव पाटील, मनोहर बिराजदार, प्रभाकर बिरजदार, सुग्रीवं ओवांडे,शिवा तोरकडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते