महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने इफ्तार पार्टी

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील मार्डी येथे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे तालुकाध्यक्ष तानाजी माटे यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी रात्री ६:४५ वाजता हजरत ख्वाजा जैनोद्दीन चिश्ती उर्फ जिंदावली दर्गाह आवारात मस्जिद येथे ही इफ्तार पार्टी संपन्न झाले.
उमरगा उपविभागीय पोलीस अधिकारी सदानंद शेलार, लोहारा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलीस उपनिरीक्षक विनोद जोकार सचिन केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
लोहारा तालुका हा सर्व जाती धर्म समभाव जोपासणारा तालुका आहे. हिंदु- मुस्लीम- बौद्ध मोठ्या एकोप्याने राहतात. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतात. सर्व धर्मीयांचे सण उत्सव शांततेत साजरे होतात. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे लोहारा अध्यक्ष तानाजी माटे यांनी मार्डी येथील मुस्लीम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी लोहारा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, मार्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष आरिफ पठान, पोलीस कॉन्स्टेबल व्यंकट वाकळे, पोलीस नाईक अर्जून तिघाडे, गृहरक्षक दलाचे जवान प्रकाश कोकरे मस्जिदचे इमामसाब सादीक शेख,यूसुफ पठान,रसूल शेख,अजीज शेख, अहमदपशा शेख,शकील शेख,मुकरमपाशा शेख, मैनुद्दीन, अकबर ईनामदार मुजफर शेख तसेच लहान मुले उपस्थित होते.